👁 10 Views

राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी

मुंबई : राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी मागणी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी केली आहे. विशेष म्हणजे महापालिका सभागृहात एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईतील नगरसेवकांना वांद्रे-वरळी सी लिंकवर टोलमाफी दिली आहे. आता राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी नगरसेवकांची मागणी आहे.

मुंबईतील अनेक नगरसेवकांना अनेक उपक्रमांना भेटी देण्यासाठी शहराबाहेर जावं लागतं. तसंच खासदार आणि आमदारांना सर्व टोलनाक्यावर विनामूल्य प्रवास सवलत आहे. त्यासाठी टोलमाफी मिळावी असं नगरसेवकांचं म्हणणं आहे.

त्यामुळे आता राज्य सरकार, व्हीआयपी ट्रीटमेंट देत नगरसेवकांना टोलमाफी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *