👁 7 Views

इंडियन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानी चौक्या नेस्तनाबूत

श्रीनगर, दि. 23 – सीमेवर कुरापती काढणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चांगलाच धडा शिकवला आहे. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीला मदत करणा-या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने कारवाई करुन उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरले अशोक नरुला यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती देताना कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला.

30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणा-या चौक्या लष्कराने तोफगोळयाच्या वर्षाव करुन उद्ध्वस्त केल्या. दहशतवाद विरोधी रणनितीतंर्गत ही कारवाई करण्यात आली. सीमेवर घुसखोरीला मदत करणा-या पोस्टसवर वेळोवेळी अशा प्रकारची कारवाई केली जाते अशी माहिती मेजर नरुला यांनी दिली.

घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाहीय. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *