👁 11 Views

पनवेलमध्ये भाजपची मुसंडी, मालेगावात शिवसेना

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेचे कल हाती यायला सुरूवात झाली आहे. पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत भाजपनं शेकापला मागं टाकत मोठी आघाडी घेतली आहे. तर मालेगाव महापालिकेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. भिवंडीत मात्र काँगेसची घौडदौड सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. 


नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेवर शेकापचं वर्चस्व राहणार की भाजपचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपनं जोरदार आघाडी घेऊन सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. भाजपनं २८ जागांवर आघाडी घेऊन सत्तेच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. पनवेलमध्ये शेकापने ११ तर शिवसेनेने अवघ्या एका जागेवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पनवेलमध्ये भाजप आणि शेकापमध्येच खरी चुरस असल्याचं चित्र आहे.


गोमांस आणि तिहेरी तलाकमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. यापार्श्वभूमीवर होत असलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूनं कौल देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे मुस्लिम मतदारांनी भाजपचा पर्याय नाकारत शिवसेना आणि एमआयएमच्या पारड्यात मते टाकलेली दिसत आहे. मालेगावात शिवसेनेनं सर्वाधिक ७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला मात्र केवळ ३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर एमआयएमला ६ जागांवर आघाडी मिळाली आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *