👁 9 Views

मुंबई पोलिसांतून तंबाखू ‘तडीपार’

व्यसनाचे प्रमाण ७० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर
बंदोबस्ताचे लांबलचक तास, कामाचा ताण, रात्रीची जागरणं या सगळ्यांवरचा तात्पुरता दिलासा म्हणून मुंबई पोलिसांनी आपलीशी केलेली तंबाखूची चिमूट आता हळूहळू हद्दपार होत असल्याची शभवार्ता आहे! मुंबई पोलिसांमधील तंबाखू खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून ते ७० टक्क्यांवरून ३५ टक्‍क्यांपर्यंत कमी झाले असल्याचा दावा ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ने (सीपीएए) केला आहे.


‘सीपीएए’ने २०१५मध्ये जागतिक तंबाखूरहित दिनाचे औचित्य साधून ‘तंबाखूरहित मुंबई पोलिस स्टेशन’ ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत तंबाखू, गुटखा, पानमसाला, सिगारेट, विडी इत्यादींच्या सेवनामुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याचबरोबर त्यांची मौखिक तपासणीही करण्यात आली. ज्यांच्या बाबतीत प्राथमिक दुष्पपरिणाम आढळले त्यांना डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेण्यास सुचवण्यात आले. मरीन ड्राइव्ह, माता रमाबाई मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, सायन, माटुंगा, वरळी, धारावी, मलबार हिल, नागपाडा, भायखळा जेल व माहीम या पोलिस ठाण्यांतून सुमारे १५००पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे समुपदेशन करण्याबरोबरच तंबाखू सोडणे व तणाव व्यवस्थापन याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यातून अनेकांचे व्यसन सुटल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती सीपीएएच्या कार्यकारी संचालक अनिता पीटर यांनी दिली.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *