राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच लातुर जिल्ह्यात झालेल्या हेलीकाप्टर अपघातातून बचावले असून या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना आपल्यावर विठ्ठलाची कृपा असल्यानेच अपाण बचावलो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.संपुर्ण राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे कटीबध्द असलेले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रास लाभले आहेत.त्यांना उदंड आयुष्य लाभो असे साकडे आज विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या वतीने विठ्ठलास घालण्यात आले.यावेळी श्री विठ्ठलाच्या चरणी राहुल साठे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले.यावेळी नगर पालीका पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसट,मंत्रालय मुंबई येथील सहाय्यक कक्ष अधिकारी विजय सावंत,नगरसेवक नाना कवठेकर,ज्ञानेश्वर वाघमारे,किशोर दंदाडे,महावीर कांबळे,बंटी वाघ,सुरेश शिरसट,दिपक भोसले,संतोष माने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की,लातुर येथील भिषण अपघातातून मुख्यमंत्री सहिसलामत वाचले ही आणि राज्यावरील एक मोठे अरिष्ट टळले असून राज्यातील जनतेच्या हितासाठी प्रामाणिपणे काम करणारे मुख्यमंत्री आपणास लाभले आहेत.आज आम्ही पांडुरंगास साकडे घालून महाराष्ट्रास प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली आहे.





