राज्य अधिस्वीकृती समितीच्या नवव्या बैठकीस सोलापुरात प्रारंभ
सोलापूर दि 27 :- राज्यात सोलपूरची वेगळी ओळख असून या जिल्ह्याने नेहमीच विकासाभिमुख राजकारण करुन जिल्ह्याच्या नाव लौकिक राज्य व देशभर पसरविला असल्याचे मत राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी आज सोलापूर येथे बोलतांना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या नवव्या बैठकीच्या कामकाजास आज सोलापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट को ऑप सोसायटीच्या सभागृहात प्रारंभ झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर, लोकमंगल समुहाचे अविनाश महागावकर, दैनिक लोकमतेचे संपादक तथा पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष राजा माने उपस्थित होते. या बैठकीचे कामकाज दिनांक 27 व 28 मे 2017 या दिवशी होणार आहे.
यदू जोशी म्हणाले, सोलापूरची ओळख आता बदलत आहे. स्मार्ट सिटीत पहिल्या टप्यात समावेश झाल्याचे या शहराचा विकास आता झपाट्याने होणार आहे. लोकमंगल सारख्या समुहाने जिल्ह्यात समाजिक विधायक उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचेही ते म्हणाले.
श्री. मानकर म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात बदल करण्याचे काम लोकमंगल समुह करीत असून यातून सोलापूरचा विकासही साधला जात आहे. ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या संमलेनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भूजबळ यांचे सावरकरांची पत्रकारिता या विषयी व्याखान होत असल्याबद्दल त्यांनी श्री. भुजबळ यांच्या अभिनंदाचा ठराव यावेळी मांडला.
लोकमंगल समुहाचे महागावकर यांनी लोकमंगल समुहाच्यावतीने राबण्यात येत असलेल्या लोकमंगल अन्नदान योजना, लोकमंगल विद्यादान योजना, लोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि लोकमंगल सामुहिक विवाह सोहळा याबाबतची माहिती चित्रफितीद्वारे दिली. यावेळी राजा माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर आणि राज्यात निधन झालेल्या ज्ञात अज्ञात पत्रकारांना समितीच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. तद्नंतर लोकमंगल समुहातर्फे सर्व समिती सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
शासकीय सेवत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संचालक शिवाजी मानकर यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल संचालक मानकर यांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर वरिष्ठ सहायक संचालक किशोर गांगुर्डे यांचे अभिनंदन करण्यात आले.
राज्य अधिस्वीकृती बैठकीच्या आयोजनामध्ये सहकार्य केल्याबद्दल लोकमंगल समुहाचे अविनाश महागावकर यांचे विशेष अभिनंदन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी केले. श्री. महागावकर यांचा सत्कार समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
बैठकीस समिती सदस्य रवींद्र बेडकीहाळ, विलास मराठे, शंतनू डोईफोडे, योगेश त्रिवेदी, किरण नाईक, नंदकुमार सुतार, उन्मेष पवार, विनोद जगदाळे, प्रसाद काथे, कृष्णा शेवडीकर, प्रकाश कुलथे, लक्ष्मणदास इनामदार, चंद्रकांत शिंदे, मधू कांबळे, क्लारा लेवीस, पूजा शहा, संतोष पवार, औरंगाबाद विभागाचे प्र.माहिती संचालक व लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, युवराज पाटील उपस्थित होते.




