एक लाख ८० हजार विद्यार्थ्यांच्या भाग्याचा आज फैसला
यंदाची बारावी परीक्षा देणार्या नागपूर मंडळातील एक लाख ८० हजार २०० विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला उद्या मंगळवार ३० मे रोजी लागणार आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार ३० मे मंडळाच्या संकेतस्थळावरून दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
संकेतस्थळावरून निकाल जाहीर केल्यापासून गुणपत्रिका शाळांना वितरित करण्याच्या दिवसापर्यंत विद्यार्थी व पालकांसाठी नागपूर विभागीय मंडळ, नागपूर या कार्यालयामार्फत हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत आहे, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. हेल्पलाईन सेवा व समुपदेशनाची सेवा ३० मे ते निकाल वितरणाच्या दिनांकापर्यंत २४ तास सुरू राहणार आहे.
नागपूर विभागांतर्गत येणार्या सहा जिल्ह्यांमधील ४३६ परीक्षा केंद्रावरून एक लाख ८० हजार २०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात भंडारा येथील २०,३२३ (परीक्षा केंद्र ५८), चंद्रपूर ३१,९९६ (७५), नागपूर ७१,२६६ (शहर ७०, ग्रामीण ७५), वर्धा १९,९४९ (४६), गडचिरोली १४,२५३ (४३) व गोंदिया येथील २३,२१३ (६९) विद्यार्थ्यांचा समावेश होता. या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ९१,४६४ मुले असून मुलींची संख्या ८८,७३६ आहे. या परीक्षेत विज्ञान विषयाचे ७१,२०९, कलाचे ७५,९२६, वाणिज्यमध्ये २१,१६५ आणि एमसीव्हीसीचे ८९०० विद्यार्थी बसले होते.
मंडळाने आज अधिकृतरीत्या निकालाची तारीख जाहीर केली असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना आता विराम मिळाला आहे.