राज्य व केंद्रातील शेतीचे उत्पन्न वाढीबरोबरच बळीराजाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्न
करीत असून शेतकर्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यावर मार्ग काढण्यासाठी, तसेच भाजपा सरकारच्या
विविध योजनांची माहिती शेतकर्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात शिवार संवाद सभेचे आयोजन
केले असल्याची माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी, भाळवणी, हुलजंती येथे शिवार संवाद आयोजित कार्यक्रमात
तालुका निरीक्षक म्हणून शेतकरी वर्गाशी आ.प्रशांत परिचारक यांनी संवाद साधला.
याप्रसंगी शेतजमीन व पिकांची पाहणी करताना औदुंबर वाडदेकर, शशीकांत चव्हाण, शिवाजी
नागणे, मधुकर चव्हाण, संतोष मोगले, शिवाजी कटप आदी मान्यवर व शेतकरी वर्ग मोठ्या संखेने
उपस्थित होता.
यावेळी बोलताना आ.परिचारक म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी मागील दोन
वर्षात राज्यात पाणी अडवा व पाणी जिरवा यासाठी जलसंधारणामार्फत वापरलेल्या विविध प्रणालीमुळे
पाणी टंचाईवर मात करणेस मदत झाली आहे. शासन शेतकर्यांसाठी विविध योजना राबवित आहेत, त्याचा
लाभ शेतकर्यांना होत आहे. पीकवीमा, शेततळे, बी बीयाणे, रासायनिक खते, माती निरीक्षण, उन्नत शेती
योजना, गाळमुक्त तलाव व गाळमुक्त शिवार आदी शासनांच्या योजनांची माहिती यावेळी देणेत आली.
तसेच आपली शेती ही पारंपारिक पध्दतीने न करता शासनातर्फे राबवित असणार्या उपाययोजनांची माहिती
घेवून आधुनिक पध्दतीचा अवलंब करून केली गेली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान राबवित असताना पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्याचे नियोजन करणे
आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग व श्रमदान आवश्यक असून तरूणांचा सहभागही महत्वाचा आहे.
आपल्या भागातील जुन्या बंधार्याचे खोलीकरण व रूंदीकरण, कोल्हापूर पध्दतीच्या व साठवण बंधार्याची
दुरूस्ती, विहीर/बोअरवेल पुर्नभरण, तलाव, नाले, साठवण, शिवकालीन, सिमेंट बंधारे यामधील माती व
गाळ काढणे व साठवण क्षमता वाढविणे, पाण्याचे वापराबाबत प्रभावीपणे जनजागृती करून वृक्ष लागवड
करणे आदी उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
बळीराजाचे कष्टाला योग्य मौल मिळावे यासाठी शासनामार्फत विजेच्या सुविधा, शेतीमालाला
चांगला भाव देणेसाठी बाजारपेठेची उपलब्ध करून देणे यासारखे उपक्रम राबवत आहे. प्रत्येकाच्या हाताला
काम व शेतकर्याच्या शेताला पाणी मिळाले तर प्रत्येक शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. येणार्या
काळात कोणत्याही शेतकर्यावर अन्याय होणार नाही, यासाठी आम्ही काम करू असे त्यांनी यावेळी
आश्वासन दिले.
यावेळी आ.परिचारक यांनी शेतकरी वर्गास गावामध्ये येणार्या विजेच्या ट्रान्सफर्मर, रस्ते, उजनीचे
पाणी यातील अडचणीबाबत संबंधित अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तत्काळ
कामांचे आदेश दिले.
Posted inPandharpur
जलयुक्त शिवार संवाद
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





