👁 9 Views

अंकिता लोखंडेला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक, या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम. By

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे आता लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ या झी मराठीवरील मालिकेनंतर अंकिता बराच बॉलिवूड एन्ट्रीसाठी प्रतिक्षा करत होती, अखेर तिला संधी मिळाली. अंकिता लोखंडे ही अभिनेता संजय दत्त याच्यासोबत बॉलिवुडमध्ये एन्ट्री घेणार आहे.
अंकिता लोखंडे हिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र त्यानंतर ती केवळ सुशांतसिंग राजपूत याच्या सोबतच्या अफेअरमुळेच चर्चेत होती. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झाल्यावर ते पुन्हा चर्चेत आले. मात्र त्या मालिकेनंतर तिला कुठेही मोठं काम मिळालं नाही. अंकिताने पहिला बॉलिवूड सिनेमा साईन केल्याची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्तचा आगामी सिनेमा अंकिताने साईन केलाय. संजय दत्त लवकरच ‘मलंग’ असे नाव असलेल्या सिनेमात दिसणार आहे.
दरम्यान, या सिनेमाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. याआधी अंकिता शाहरूख खानसोबत ‘हॅपी न्यू ईयर’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर होती. पण ही खबर पुर्णत: खोटी ठरली. या सिनेमात अंकिता नाही तर दीपिका पादुकोणची वर्णी लागली. यापश्चात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’मध्येही अंकिता झळकणार, अशीही चर्चाही रंगली. पण ही चर्चाही केवळ पोकळ ठरली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *