👁 11 Views

संपाची हाक कायम, 5 जूनला मुंबईवगळता महाराष्ट्र बंद

अहमदनगर, दि. 02 – जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी शेतक-यांनी घेतला आहे.

पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच, 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *