👁 11 Views

शेतकरी संपाबाबत संभ्रम कायम

मुंबई
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्येच उभी फूट पडल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचं बोललं जात असलं तरी नाशिक व अहमदनगरसह काही ठिकाणी तिसऱ्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तसंच, महाराष्ट्र राज्य किसान सभेनंही संप मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळं संपाबाबत संभ्रम कायम आहे.


शेतकऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, किसान सभेनं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांवर आक्षेप घेतला आहे. ‘या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं. संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी सरकारनं मान्य केलेली नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना गोलमाल उत्तरं दिलीत. त्यामुळं आम्ही संप सुरूच ठेवणार आहोत. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाहीत, तोवर मागं हटणार नाही,’ अशी भूमिका किसान सभेनं मांडली आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *