👁 8 Views

भाजपाच्या कार्यविस्तार योजनेचा थाटात शुभारंभ

पहिल्या दिवशी १२०० कुटुंबांशी संपर्क 
नागपूर, २ जून
पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेचा आज शुभारंभ करताना भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या उपलब्धींची माहिती करून देत पहिल्या दिवशी शहरातील १२०० कुटुंबांशी संपर्क साधला. कुटुंबांप्रमाणेच दुकानदारांशी संपर्क साधून त्यांना माहितीपत्रके देण्यात आली.
नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रनिहाय या जनसंपर्क अभियानाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. आ. कृष्णा खोपडे आणि शहराचे प्रमुख कार्यविस्तारक जयप्रकाश गुप्ता यांनी या अभियानाचे नेतृत्व करीत व प्रत्यक्ष अभियानात सहभागी होत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
दक्षिण नागपूर विधानसत्रा क्षेत्रात विलास करांगले, प्रशांत कामडी यांनी, पूर्व क्षेत्रात आ. कृष्णा खोपड़े, महेंद्र राऊत, प्रमोद पेंडके, बंटी कुकडे, धर्मपाल मेश्राम, चंदन गोस्वामी, मध्य क्षेत्रात जयप्रकाश गुप्ता, आ. विकास कुंभारे, बंडू राऊत, प्रवीण दटके यांनी नेतृत्व केले. या अभियानांतर्गत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बळवंतराव ढोबळे यांचा सन्मान करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दयाशंकर तिवारी, ऍड. संजयकुमार बालपांडे, सरला कमलेश नायक, विद्या राजेश कन्हेरे, बाळू बांते, प्रभाग अध्यक्ष अशोक नायक प्रामुख्याने उपस्थित होते.
उत्तर नागपुरात आ. डॉ. मिलिंद माने, भोजराज डुंबे, पश्‍चिम नागपुरात आ. सुधाकर देशमुख, संदीप जाधव, दक्षिण पश्‍चिम नागपुरात प्रा. राजीव हडप, संदीप जोशी यांनी अभियानात भाग घेत सकाळी आठ वाजतापासून घरोघरी जनसंपर्क करून केंद्र, राज्य सरकारने केलेल्या जनहितार्थ कार्यांची माहिती दिली.
श्याम चांदेकर, विलास (गुड्डू) त्रिवेदी, मनोज चापले, श्रीकांत आगलावे, श्रद्धा पाठक, कांता रारोकर, बाल्या रारोकर, संजय अवचट, समिता चकोले, वंदना भुरे, हरीश दिकोंडावार, प्रदीप पोहाने, देवेंद्र काटोलकर, सेतराम सेलोकर, बाळा विटाळकर, सुनील सूर्यवंशी, संतोष लढ्ढा, सुनील कोठे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते विविध ठिकाणांच्या अभियानात सहभागी झाले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *