👁 10 Views

शेतकरी संपाचा पाचवा दिवस’; शिवसेनेचा पाठिंबा, राहुरीत शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर पेटवला

नाशिक/ अहमदनगर-मुख्यमंत्री आणि किसान क्रांती समितीतील बैठकीतील मुद्दे राज्यातील शेतकऱ्यांना अमान्य असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक होत रविवारी बैठक घेतली. याता नवीन कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन सहा ठराव मंजूर केले. तसेच यात राज्यभरातील शेतकरी नेते अाणि विचारवंतांनी ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री दुधाचा टँकर पेटवला. राहुरी खुर्द गोंटुबा आखाडा येथे ही घटना घडली. दरम्यान, एक जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप निर्णायक वळणावर पाेहाेचला असून अाता माघार घेणार नसल्याचा निर्धार सर्व शेतकरी नेत्यांनी जाहीर केला. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांसह पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा देऊन बंद यशस्वी करणार असल्याचे सांगितले.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी दुपारी शेतकऱ्यांची संपाबाबत बैठक आयोजित पार पडली. त्यात औरंगाबाद, नगर, पुणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बीड, परभणी आदी जिल्ह्यातील ७ ते ८ हजार शेतकरी आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हा पहिलाच बंद असून प्रत्येक शेतकऱ्याने अापल्या कुटुंबासह सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात अाला. बैठकीत ज्येष्ठ शेतकरी विचारवंत बुधाजीराव मुळीक, रामचंद्र पाटील, डाॅ. अनील नवले, गाेकुळ काकड, हंसराज वडघुले व राजू देसले आदींनी विचार मांडले.

बैठकीमध्ये असे झाले ठराव
१. संप काळात शेतकऱ्यांवर गुन्हे मागे घ्यावे. 
२. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुसते आश्वासन देऊ नये, तर निर्णय घ्यावा.
३. राज्यभरात सोमवारी कडकडीत बंद. 
४. सर्व शेतकरी संघटनांचा एक-एक प्रतिनिधी घेऊन मुंबईत येत्या मंगळवारी कोअर समितीची बैठक होणार.
५. आठ जूनला नाशकात खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मेळावा.
६. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा संप सुरूच राहणार.
शिवसेनेचा पाठिंबा पण…
शेतकर्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, हा पाठिंबा मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणच्या बंदला असेल असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

जयाजी सूर्यवंशींच्या घरासमोर नारेबाजी
औरंगाबाद- संभाजी ब्रिगेड, छावा यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त देण्यात आला

बैठकीमध्ये असे झाले ठराव
१. संप काळात शेतकऱ्यांवर गुन्हे मागे घ्यावे. 
२. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना नुसते आश्वासन देऊ नये, तर निर्णय घ्यावा.
३. राज्यभरात सोमवारी कडकडीत बंद. 
४. सर्व शेतकरी संघटनांचा एक-एक प्रतिनिधी घेऊन मुंबईत येत्या मंगळवारी कोअर समितीची बैठक होणार.
५. आठ जूनला नाशकात खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी मेळावा.
६. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत 

शिवसेनेचा पाठिंबा पण…
शेतकर्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, हा पाठिंबा मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणच्या बंदला असेल असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

जयाजी सूर्यवंशींच्या घरासमोर नारेबाजी
औरंगाबाद- संभाजी ब्रिगेड, छावा यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त देण्यात आला

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २ जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला होता. पण याच मागणीवरून सर्व शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केल्याने यामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सक्रिय होणार आहे. उद्या सोमवार (ता.5 )रोजी होणारा राज्यव्यापी बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथील शासकीय निवासस्थानावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *