👁 9 Views

‘शेतकरी आंदोलन करतच नाहीए!’

नवी दिल्ली


राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात कुणीही शेतकरी सहभागी झालेला नाही. ‘महाराष्ट्र बंद’च्या नावाखाली रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ कोण करत होतं, याची माहिती आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या मागे लपून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत, परंतु बळीराजाला सगळंच ठाऊक आहे, अशी चपराक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना लगावली. 


खऱ्या शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करायला सरकार तयार आहे आणि अल्पकर्जधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


संपूर्ण कर्जमाफीसह हमीभाव आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेले आहेत. सोमवारी तर विविध शेतकरी संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ पुराकला होता. त्याला उत्तर महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला. बळीराजा आक्रमक झाल्यानं हा संप आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. परंतु, हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून विरोधकांचं असल्याचा पुनरुच्चार आज मुख्यमंत्र्यांनी केला.
कालच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान जवळपास सगळे व्यवहार सुरू होते. ३०७ पैकी ३०० बाजार समित्या सुरू होत्या. तुरळक भाग वगळता जनजीवन सुरळीत होतं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. जिथे हिंसक आंदोलन झालं, तिथे कुणीही शेतकरी नव्हता. राजकीय पक्षांचे नेते हे आंदोलन करत होते. त्यांची सगळी माहिती आम्हाला मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या मागे लपून पोळी भाजण्याचं काम करणाऱ्या या पक्षांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी ठणकावलं. 


सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे आणि त्यांनी कर्जमाफी द्यायलाही तयार आहे. ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असंही फडणवीस यांनी जाहीर केलं.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *