कारंजा (घा), ९ जून
गावाच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. कारंजा तालुक्यातील पारडी येथे खासदार विकासनिधीतून विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खा. रामदास तडस यांनी पारडी गाव दत्तक घेतले आहे. गावाच्या विकासाकरिता कटिबद्ध असून स्वच्छ भारत मिशन, जनधन योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वल योजना, पीकविमा योजना, जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या आहेत. अशा विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेऊन विकास साधावा, असे खा. तडस यांनी सांगितले.
फक्तनिधी आणून विकास न करता सोबतच शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहचविणे, प्रबोधन करणे, स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी करणे, नागरिकांची जनजागृती करणे असे गाव विकासात्मक उद्देश ठेऊन आदर्श ग्राम संकल्पना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले. खासदार दत्तकग्राम पारडी येथे स्थानिक विकासनिधीतून बांधण्यात येणार्या प्रवासी निवारा, मोरेश्वर टिपले ते मुंगभाते यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, यादवराव वहाणेे ते बिरसा मुंडा झेंड्यापर्यंत सिमेंट रस्ता तसेच हेटी ते दिलीप चरडे ते पुरुषोत्तम टिपले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता, पारडी व एकांबा येथे हँडपंप बसविणे या कामाचे भूमिपूजन खा. तडस यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला खा. रामदास तडस, माजी आ. दादाराव केचे, महिला व समाजकल्याण सभापती नीता गजाम, पंचायत समिती सभापती मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खवशी यांचा पारडी ग्रामवासीयांतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच सोना भलावी,
सहायक गटविकास अधिकारी सातघरे, हरीश तांदळे यांची उपस्थिती होती. संचालन नितीन हिरूडकर, प्रास्ताविक पि. डी. राडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. देवीदास केवटे यांनी केले. (वृत्तसेवा)

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111