👁 15 Views

VIDEO : …म्हणून या गाण्यात सलमान चक्क रडला

राहत फतेह अली खानच्या आवाजातील ‘तिनका तिनका दिल मेरा’ हे गाणं ऐकताना प्रेक्षकांचेही डोळे


सलमान खानचा चित्रपट ‘ट्युबलाइट’मधील तिसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोन गाण्यांच्या विरुद्ध असे हे गाणे असून, या तिसऱ्या गाण्यात सलमान अत्यंत भावूक होऊन रडताना दिसतो. पहिल्या दोन गाण्यांमध्ये सलमान आपला भाऊ सोहेलसोबत मजा-मस्ती करताना दिसला आहे. तर यामध्ये तो युद्धासाठी निघालेल्या आपल्या भावाशी वेगळे होण्याच्या दु:खात जोरजोरात रडताना दिसतो. राहत फतेह अली खानच्या आवाजातील ‘तिनका तिनका दिल मेरा’ हे गाणं ऐकताना प्रेक्षकांचेही डोळे पाणावतील. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरीसुद्धा दिसत आहेत.
तीन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये सलमान आणि सोहेलमधील प्रेम, बांधिलकी दाखवत एकमेकांपासून वेगळे होण्याची घटना अत्यंत भावनात्मक पद्धतीने मांडली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान सलमानचा भाऊ म्हणून सोहेलच्या ऐवजी अक्षय कुमारला घेणार असल्याचा विचार होता असं सांगितलं होतं. मात्र सलमान आणि सोहेलमधील बांधिलकी दुसऱ्या कलाकारासोबत निर्माण करण्यासाठी कदाचित मला जास्त वेळ लागला असता असंही कबीर खान यावेळी म्हणाला. कबीर खानच्या या वाक्याची प्रचिती आपल्याला ‘तिनका तिनका’ हे गाणं पाहून नक्कीच येईल.
भारत-चीन युद्धावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू हीदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सलमान खान आणि त्याची आई सलमा यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘ट्युबलाइट’चं चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *