👁 9 Views

हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकून इंजिनिअर ठार

नवी दिल्ली


हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकून एका इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बद्रीनाथ येथे घडली. हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून हरिद्वारला जात होते.


‘द ऑगस्टा ११९’ हे हेलिकॉप्टर ८ प्रवाशांना घेऊन बद्रीनाथहून हरिद्वारला जात असताना अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये ५ प्रवाशी, दोन पायलट आणि एक इंजिनिअर प्रवास करीत होते. या हेलिकॉप्टरला ७.४५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पंख्याला अडकून इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू. एक पायलट जखमी झाला असून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती हवाई वाहतूक (DGCA) अधिकाऱ्याने दिली.


Helicopter failed to take off in Badrinath as it couldn’t gain height.Pax&pilot safe;engineer died on being strangled in helicopter’s blades
Uttarakhand: Helicopter failed to take off & crashed in Badrinath. Pax & pilot safe; engineer died on being strangled in helicopter’s blades pic.twitter.com/CZJoVY6tcR
View image on Twitter



अपघाती घटनास्थळावर पथक पाठवण्यात आले असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती हवाई वाहतूक अधिकाऱ्याने दिली.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *