येत्या १६ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज बदलणार आहेत.
येत्या १६ तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज बदलणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यानुसार ग्राहकांना आता घरबसल्या मोबाईलवरून केवळ एक SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती मिळेल. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या निर्णयाला वितरकांनी विरोध केला होता. मात्र, तेल कंपन्या या निर्णयावर ठाम आहे. यासाठीची सर्व तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार वितरकांना आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दुसऱ्या दिवशीचे दर कळवण्यात येतील. तर सामान्य ग्राहकांना मोबाईलवरून SMS पाठवून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती मिळवता येईल. यासंबंधी हिंदूस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी आदेश जारी केले आहेत. नवी प्रणाली लागू झाल्यानंतर प्रत्येक शहरात आणि प्रत्येक पेट्रोलपंपावर पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळेही असू शकतात. मात्र, त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक ठिकाणचे दर जाणून घेण्यासाठी पेट्रोल पंपावर खेटे मारावे लागले असते. मात्र, SMS सुविधेमुळे ग्राहकांना प्रत्येक पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर घरबसल्या कळू शकणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ६ जूनपासून इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणार आहेत. पेट्रोलियम पदार्थाच्या दरामध्ये दररोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली होती. यानुसार पुदुच्चेरी, उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. या शहरांमधील प्रतिसादाच्या आधारे देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
सध्याच्या पद्धतीनुसार भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर ९५ टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास ५८ हजार पेट्रोल पंप आहेत. दरदोज दर बदलल्यामुळे ग्राहकाला दर १५ दिवसांनी होणाऱ्या मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे ग्राहक बदलत्या बाजारपेठेशी अधिक जोडला जाईल, असा दावा केला जात आहे. विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात.
‘इंडियन ऑईल’च्या पेट्रोल पंपावरील दर कसे जाणून घ्याल.
* www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
* Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेऊ शकता.
* मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. मात्र, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणे आवश्यक आहे.

‘भारत पेट्रोलियम’च्या पेट्रोल पंपावरील दर कसे जाणून घ्याल.
* www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
* मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर जाणून घेऊ शकता.
* मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. मात्र, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणे आवश्यक आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111