👁 11 Views

फेसबुकवर इस्लामची निंदा केल्याने पाकिस्तानात एकाला फाशीची शिक्षा

व्यक्तिगत हेवेदावे काढण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो अशी टीका होते.

पाकिस्तानातील अल्पसंख्याक शिया समाजाच्या एका व्यक्तीला फेसबुकवर इस्लामची निंदा केल्याने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशा प्रकारची ही पहिलीच शिक्षा आहे. सायबर गुन्ह्य़ाचा विचार केला तरी त्याचे स्वरूप पाहिलेतर ही शिक्षा फारच कठोर मानली जात आहे. ईश्वरनिंदेच्या आरोपावरून अजून पाकिस्तानात कुणाला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही.
पंजाब प्रांतातील बहवालपूर जिल्ह्य़ातील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश शाबीर अहमद यांनी तीस वर्षे वयाचा आरोपी तैमूर रझा याला शनिवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फेसबुकवर ईश्वरनिंदा करणारा मजकूर टाकल्याने त्याला दोषी ठरवण्यात आले.
रझा हा ओकारा येथील असून त्याला गेल्या वर्षी बहवालपूर येथे अटक ककण्यात आली होती कारण त्याने ईश्वरनिंदा करणारा मजकूर मित्रांना पाठवला होता. पाकिस्तानात ईश्वरनिंदा हा संवेदशील प्रश्न असून त्या देशात ९७ टक्के लोक मुस्लिम आहेत. ईश्वरनिंदा कायद्यामुळे पाकिस्तानवर हक्क गटांची नेहमी टीका होत असते.
व्यक्तिगत हेवेदावे काढण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो अशी टीका होते. पाकिस्तानने गेल्या वर्षी वादग्रस्त सायबर गुन्हे विधेयक मंजूर केले होते. त्यात सायबर गुन्ह्य़ांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *