👁 10 Views

10 हजार रुपयांचं कर्ज घेताना शपथपत्र देण्याची सक्ती नाही : मुख्यमंत्री

पुणे : शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांचं कर्ज देण्यासाठी अटी घातलेल्या आहेत. मात्र त्या अटींसाठी सरकार फार आग्रही नाही. यामध्ये शपथपत्र देण्याची अट आहे. पण शेतकऱ्यांना शपथपत्र देण्याची कोणतीही सक्ती नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना दिलं.
श्रीमंत व्यक्ती, करदाते यांना यातून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे शपथपत्र घेतलं जात आहे. मात्र शेतकऱ्यांना शपथपत्र देणं सक्तीचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज देण्‍याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर  यासंबंधीचा जीआर आता शासनाने जारी केला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना 2-3 महिने मोठी मेहनत करावी लागणार आहे. मागच्या वेळेस दिलेल्या कर्जमाफीचा अनुभव चांगला नाही. मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचं उघड झालं. कॅगच्या अहवालात सर्व गोष्टी मांडण्यात आल्या. तसं होऊ नये, यासाठी आपल्याला काम करावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
10 हजार रुपयांचं कर्ज मिळवण्याचा शासन निर्णय काय?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *