कायदा-सुव्यवस्था राखण्याचे बंगाली जनतेला आवाहन
कोलकाता, १८ जून
भारतीय लोकशाही व्यवस्थेत हिंसेला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. केवळ चर्चेच्या, संवादाच्या माध्यमातूनच आंदोलकांच्या समस्या सोडविल्या जाऊ शकतात. बंगाली जनतेने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले.
मागील सात दिवसांपासून गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी दार्जिलिंग मोठे आंदोलन उभे केले आहे. अनेक ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ले करण्यात आले असून, लष्कराच्या तुकड्या करण्यात आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर गृहमंत्री सिंह यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे जीजेएमचे अध्यक्ष बिमल गुरंग यांनी सरकारला इशारा दिला असून, पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण करण्यात येईल, असे म्हटले आहे. संघटनेचे सरचिटणीस यांनी या प्रकरणी केंद्र सरकारने मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, दार्जिलिंगमधील परिस्थिती बिघडत असून, आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की राज्य सरकार कोणत्या पद्धतीने आंदोलनाला दडपत आहे.
मोठे षडयंत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी आपल्या राज्यातील अशांततेबाबत म्हटले की, राज्यात सुरू असलेल्या आंदोलनामागे मोठे षडयंत्र आहे. हे सर्व एका दिवसात झालेले नाही. लहानशा काळात जीजेएमने शस्त्रे गोळा केलेली नाहीत. या षडयंत्राचे मूळ खोलवर गेलेले आहे. त्यांना अवैध शस्त्रे आणि पैसा कुठून मिळतात, हे सर्वांना माहिती आहे. सरकार गोरखा जनमुक्ती मोर्चासोबत चर्चेला तयार आहे. मात्र, आम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही.
राजनाथसिंह यांना फ्रॅक्चर
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह रविवारी सकाळी नियमित फिरण्याच्या वेळी घसरून पडले व त्यांच्या डाव्या पायाला किंचित फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना तत्काळ एम्समध्ये नेण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




