कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीरातील पुजार्यांविरोधात काही दिवसापासून अचानक बदनामीची मोहीम काही समाजविघातक प्रवृत्तींनी हाती घेतली आहे.यातुनच कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीरातील पुजार्यांना हटविण्याची मागणी आता पुढे आली आहे.या मंदीरातील पुजार्यांच्या विरोधात यापुर्वी कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना अचानकपणे ही मोहीम राबवून प्रसिध्दीचा स्टंट करण्यात येत आहे.त्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिपणे पुजाविधी करणार्या पुजार्यांंमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बांगलादेशमध्ये हिंदू मंदीरामधील पुजार्यांची जी अवस्था झाली आहे तद्वतच या पुजार्यांची अवस्था झाली आहे.काल महालक्ष्मी मंदीरात घोषणााजी करुन पुजार्यांना बाहेर काढण्याचा निंदनिय प्रकार घडला आहे.हा प्रकार त्वरीत बंद झाला पाहीजे अशी मागणी कॉग्रेस प्रणित ब्राम्हण सेलचे जिल्हाध्यक्ष द.बडवे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदीरातील पुजार्यांच्या विरोधात सद्या काही संघटना व व्यक्तींनी एकतर्र्फी आंदोलन छेडले आहे.कायदा हातात घेवून या पुजार्यांना मदंीरात प्रवेश करुन रोखण्याचा व मंदीराचे प्रमुख दरवाजे बंद करण्याची धमकीही दिली जात आहे.कोल्हापूर येथील मंदीरात हे पुजारी वर्षानूवर्षे कार्यरत आहेत.या पुजार्यांकडून येथे येणार्या भाविकांना गैरवागणूक मिळाल्याचा प्रकार कधीही घडला नाही.व या मंदंीरात आलेल्या भाविकांनी तशा स्वरुपाची तक्रार केल्याचेही कधी समोर आले नाही.असे असताना महालक्ष्मी मंदीरातील पुजार्यांच्या विरोधात केवळ द्वेषापोटी कायदा हातात घेवून विरोध करण्याचा प्रकार त्वरीत रोखला जावाव व या पुजार्यांना त्वरीत पोलीस संरक्षण दिले जावे अशी मागणी आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली असून याबाबत कार्यवाही न झल्यास आषाढी एकादशीच्या महापुजेला येणार्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आम्ही आडवे पडून निषेध करुन असा इशारा द.बडवे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111