मुंबई, दि. २६ :- राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची सदीच्छा भेट घेतली.
राजभवन येथे घेतलेल्या भेटीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत किती आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार, त्यासाठी किती निधी लागणार व त्यासाठीची तरतूद कशी करणार,आदींची माहिती दिली. या योजनेच्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांशी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




