मुंबई दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात “एकच लक्ष्य चार कोटी वृक्ष लागवड”या विषयावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून चार भागात याचे प्रसारण केल्या जाईल.
या मुलाखतीत देशपातळीवर वनविकासात महाराष्ट्र नेमका कुठे आहे,मागील वर्षीची दोन कोटी ८२ लाख वृक्ष लागवड मोहीमेचे यश,चार कोटी वृक्ष लागवडीचा दिनांक १ ते ७ जुलैचा वनमहोत्सव आणि आगामी तीन वर्षात पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा निश्चीत केलेला कार्यक्रम या विषयी सविस्तर माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली आहे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दिनांक २७ ते ३० जून २०१७ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत होणार आहे. ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी घेतली आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



