👁 14 Views

वारी कालावधीत मंदीर व परिसराची स्वच्छता आधुनिक यंत्राव्दारे करणार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ.राजेंद्र भारुड

पंढरपूर दि. 24 : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत  मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. येणा-या भाविकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच ठिकाणांची स्वच्छता ठेवणे  गरजेचे आहे. यासाठी प्रथमच आधुनिक यंत्राव्दारे मंदीर व मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.
विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती व भारत विकास ग्रुप (बी.व्ही.जी)यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम भवन येथे आधुनिक यंत्राव्दारे स्वच्छता करण्याबाबतचे कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी) सुरज महाजन उपस्थित होते.
यावेळी बोलताना  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ. भारुड दर्शन म्हणाले,  मंदीराचे पावित्र्य राखून दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर तसेच मंदीरातील खांब या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी विविध रासायनिक घटकांचा वापर करुन आधुनिक यंत्राव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे.  ही स्वच्छता  कमी वेळात करण्यात येणार आहे. तसेच यापुढेही कायम स्वरुपी मंदीर परिसर स्वच्छ करण्याच्या प्रयत्नही या माध्यमातून  करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणांच्या ग्रामपंचायतींना येणा-या भाविकांना सुविधा देण्या बरोबरच स्वच्छता ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहितीही  मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ. भारुड यांनी दिली.यावेळी भारत विकास ग्रुप (बी.व्ही.जी) यांच्याकडून कर्मचा-यांना आधुनिक यंत्राव्दारे स्वच्छता करण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले..बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *