पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण
शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी म्हणुन विशेष कार्यक्रम हाती घेतला असुन या अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत युटोपीयन साखर कारखान्याचे चेअरमन व पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष सौ.सुजाता त्रिंबक बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, स्थायी समिती सदस्य सौ.सुप्रिया सचिन डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी बोलताना उमेश परिचारक यांनी सांगितले की, सध्या वृक्ष तोडीमुळे वृक्षांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा –हास होत आहे. भविष्यात निसर्ग चक्र चांगले राहणेसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हि काळाची गरज आहे. पंढरपूर शहर हे भारताची दक्षिण काशी म्हणुन ओळखली जाते. वर्षभरात भरणा-या ४ मोठ्या यात्रा व दररोज श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचा ओघ पाहता पंढरपूर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित पंढरपूर होणे गरजेचे आहे. म्हणुन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असणारे ओपन स्पेस व मुख्य रस्ते, शासकीय खुल्या जागा, कार्यालये या ठिकाणी वृक्ष लागवड करुन त्याची जतन व संवर्धन करावे अशी संकल्पना मांडली होती. त्यास नगराध्यक्ष सौ.साधनाताई नागेश भोसले व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी ही बाब मनावर घेवुन येत्या ऑगस्ट २०१७ अखेर १० हजार वृक्षांची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे सांगितले. सदरचे वृक्ष हे नुसते लावण्यात येणार नसुन त्याचे संवर्धन व्हावे या हेतुन या वृक्षांना ट्रीगार्ड लावण्यात येणार आहे. तसेच यासाठी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास नगरसेवक विशाल मलपे, नरसिंह शिंगण, विवेक परदेशी, माजी नगरसेवक सचिन डांगे, माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले, हमीद बागवान, शंकर पवार, विश्वेश्वर देवमारे, अमोल डोके, नगर अभियंता दिनेश शास्त्री, जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, सिकंदर बागवान, शिवकृपा कन्स्ट्रक्शनचे भारत थिटे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब थोपटे, बंडु बडवे हे उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



