👁 9 Views

‘कमळाबाई’च्या हातात सूत्रे, ‘धनुष्या’चे लोटांगण

आता दिवस पालटले आहेत. चार दिवस सासूचे झाले, आता चार दिवस सुनेचे आहेत.

sunil tatkare

सुनील तटकरे यांनी उडवली खिल्ली
भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र राहतात आणि एकमेकांवर आरोप करतात, असा संदर्भ देत कमळाबाईच्या हातात सूत्रे आल्यानंतर धनुष्यबाणाने लोटांगण घातले आहे, अशी खिल्ली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिंचवड येथे बोलताना उडवली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले, की भाजपची सत्ता आहे, मात्र शिवसेना फरफटत चालली आहे. यापूर्वीच्या काळात त्यांच्यातील युतीत शिवसेना ‘मोठा भाऊ’ होती. ‘कमळाबाई’ म्हणून शिवसेनेकडून भाजपची खिल्ली उडवली जात होती.
आता दिवस पालटले आहेत. चार दिवस सासूचे झाले, आता चार दिवस सुनेचे आहेत. कमळाबाईने सूत्रे हाती घेतली असून धनुष्याने लोटांगण घातले आहे, असे ते म्हणाले. बाराही महिने कष्ट करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतक ऱ्यांना, सामान्य जनतेला शरद पवारांचा आधार वाटतो आहे. आजही, ७७ वय असतानाही पवार शेतक ऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर फिरत आहेत.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *