👁 6 Views

गोपाळकाला:- संत येती घरा, फुलतो भक्तीचा मळा….

आषाढी वारीच्या दशमीदिवशी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याचे वाखरीत आगमन होते. 
🔸”त्यांच्या स्वागतासाठी श्रीक्षेत्र पंढरपुरातून श्रीसंत नामदेव मंदिरातून जगद्पिता श्री पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून श्रीसंत नामदेव महाराजांची पालखी दिंड्डी रथ टाळ-मृदूंगाच्या गजरात वाखरीला जाते. चांदीचा रथ आणि पालखी चांदीचे गोंडे, जरीची झालर आणि फुलांनी सजवली जाते.
“पालखीत प्रभावळ संत नामदेव महाराजांच्या पादुका ठेवल्या जातात”,
“ज्ञानोबा तुकोबांचा” जयघोष करीत पालखी वाखरीकडे मार्गस्थ होते. समवेत श्रीसंत नामदेव महाराजांचे वंशज, सुमारे चारपाचशे टाळकरी, चोपदार, व विणेकरी यांच्यासह पंढरपूरच्या श्री कालिकादेवी चौकातून चौफळा मार्गे केबीपी कॉलेजवरुन ही पालखी वाखरी रस्त्यावरील विसावा मंदिरापर्यंत पोहचते. तिथे अभंग, आरती झाल्यावर सुमारे दोन तास सांप्रदायिक भजन भारुड आदी कार्यक्रम करण्यात येतात. त्यानंतर आरती, अभंग होतो त्यादरम्यान वाखरीतून आळंदी व देहू वरुन आलेल्या सर्व पालखी दिंडींचे,
“जगदपिता श्री पांडुरंगाचे प्रतिनिधी श्रीसंत नामदेव महाराजांकडून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व आदिसर्व संतांचे स्वागत केले जाते”,
‘तद्नंतर वाखरीतून सर्व संतांच्या पालखी व दिंडी क्रमा-क्रमाने संत नामदेवरायांच्या पालखी समवेत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ व्हावे,
‘असा सांगावा माऊलीच्या पालखी सोहळ्याचे चोपदार आणतात’,
त्यानंतर संत नामदेवरायांच्या पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघतो. त्यापाठोपाठ सर्व संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये प्रवेश करतात.
🔹पंढरपुरातील नाथ चौकात संत ज्ञानेश्वर मंदिराच्या समोर ‘जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले’ आणि संत एकनाथ मंदिरासमोर ‘आवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले’ हे पारंपारिक अभंग म्हणण्यात येतात.
🔸तेथून पालखी महाद्वारात येते. तेथे ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ हा अभंग आणि श्री विठ्ठलाची आरती म्हटली जाते.
🎯 “त्यानंतर हा सर्व संतांचा पालखी सोहळा ‘श्रीसंत नामदेव महाराजांचे जन्मस्थान’ श्रीसंत नामदेव मंदिरात येतो”,
श्री नामदेव मंदिरात “नामदेव नामदेव, धरा भाव दृढ हा” हा अभंग म्हणून आरतीने पालखी सोहळ्याच्या प्रवेशाची सांगता होते”,
🚩”दुसऱ्या दिवशी सकाळी आषाढी एकादशीला संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदिसर्व संतांच्या पालखी दिंड्डी सोहळा मोठ्या थाटात वारकरी टाळकरी-मृदूंगाच्या तालात नगरप्रदक्षिणेला निघतात. एकादशी दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, किर्तन व हरीजागर होतो.
👏द्वादशी दिवशी खिरपतीचे भजन.
🔸”त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे सर्व संतांच्या समवेत गोपाळकाला झाल्यावर”,
🚩👣”श्री विठ्ठल मंदिरात श्रीसंत नामदेवरायांच्या पादुका देवास भेटवल्या जातात”,
याप्रमाणे वारकरी सांप्रदयाच्या परंपरेने भक्तिभावाने आषाढी वारीची सांगता होते.
(माहिती संकलित)


  




















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *