पंढरपूर Live दि. 13 जुलै 2017
पंढरपूर :- हुंड्यासाठी वारंवार होणार्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून अवघ्या दीडच वर्षाच्या संसारानंतर एका विवाहितेने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना पंढरपूरात घडली आहे. पोलिसांकडूपन समजलेल्या माहितीनुसार चैताली अभिजीत फाळके ( रा . तिरंगा नगर, पंढरपूर ) या विवाहितेने आपल्या राहत्या घरी 12 जुलैला गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवली .
याबाबत सविस्तर माहिती अशी , यातील फिर्यादी हेमंत गडेकर ( रा . तळेगाव दाभाडे ) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांची कन्या चैताली हिचा विवाह दीड वर्षापूर्वी पंढरपूरच्या अभिजीत वसंत फाळके याच्या सोबत झाला होता . लग्नाच्या पहिल्या दिवसापासुन नवरा अभिजीत आणि सासु शोभा हे चैतालीला माहेरहुन पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते . सासरच्यांकडून वारंवार मारहाण देखिल करण्यात येत होती . हा छळ असह्य झाल्याने चैतालीने 12 जुलै रोजी दुपारी छताच्या पंख्याला ओढनी बांधुन गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली . गडेकर यांच्या फिर्यादीनुसार नवरा अभिजीत फाळके आणि सासु शोभा फाळके यांच्या विरुध्द भादवि कलम 306, 498( अ ), 504 , 506 , आणि 34 नुसार पंढरपूर शहर पोलीसात गुन्हा दाखल झालाय . पुढील तपास सपोनि मदने करीत आहेत .









