15 Jul. 2017
नवी दिल्ली- काल किरकोळ किमतीवर आधारीत महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. आज घाऊक किंमतीवरील महागाईही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अन्नधान्यासह भाज्याचे दर कमी झाल्यामुळे घाऊक महागाईत घट झाल्याचे सांख्यीकी विभागाने म्हटले आहे.
जून महिन्यात घाऊक किंमतीवर आधारीत महागाई केवळ 0.9 टक्क्यानी वाढली आहे. हा आठ महिन्यांचा निचांक आहे. बटाटे आणि कांद्याचे दर या काळात फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आले आहे. अगोदर डाळी आणि प्रोटीनयुक्त पदार्थाचे दर वेगाने वाढत होते. आता या पदार्थाचे दर कमी वेगाने वाढत आहेत.
या आकडेवारीवर समाधान व्यक्त करून अर्थमंत्रालयाचे सल्लागार अरविंद सुब्रम्हन्यन यांनी सांगीतले की बरेच प्रयत्न केल्यामुळे आता महागाई पुर्णपणे आटोक्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात एकूणच अर्थव्यवस्था वेगळ्या अवस्थेत जाणार आहे.










