👁 7 Views

राज्यातील बहुतांश धरणे भरली…; मराठवाडा, विदर्भात पावसाची तूट!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

राज्यातील बहुतांश धरणे भरली…; मराठवाडा, विदर्भात पावसाची तूट!
23 Jul.2017

औरंगाबाद- यंदा जुलैच्या मध्यात राज्यातील बहुतांश धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात अातापर्यंत पावसाने तूट दर्शवली आहे. त्यामानाने मध्य महाराष्ट्र व कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा असला तरी उत्तर महाराष्ट्रातील धरणांत पुरेसा पाणीसाठा नाही. विदर्भ व मराठवाड्यातील धरणे भरण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. विदर्भात यंदा अातापर्यंत सरासरीपेक्षा ६ टक्के, तर मराठवाड्यात एक टक्का कमी पाऊस झाला आहे.
गंगापूर-दारणातून विसर्ग
नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने गंगापूर धरणांत पाण्याची आवक वेगाने होत असल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ३३२८ क्युुसेकने पाणी सोडावे लागले. दारणातून १३ हजार ९८० इतका विसर्ग करण्यात अाला.
भंडारदरा ८० टक्क्यांवर
भंडारदरा धरण क्षेत्रात साडेबारा इंच पाऊस झाल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८ हजार ७५० दशलक्ष घनफुटांवर पोहोचला. भंडारदरा ८० टक्के भरले असून घाटघर – १५४, पांजरे -२१९, तर भंडारदरा येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत संततधार; दुपारनंतर विश्रांती

शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारीदेखील झाेडपून काढले. पहाटेपासूनच पावसाने जाेर धरल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचले. मुंबईबराेबरच ठाणे, कल्याण, डाेंबिवलीतही मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे लाेकल विलंबाने धावत हाेत्या. दुपारपर्यंत पावसाची संततधार कायम राहिल्याने दादर, अंधेरीचा मिलनसबे, गाेरेगाव या भागात पाणी साचले. काही भागांत वाहतूक काेंडी झाली. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास समुद्राला माेठी भरती येऊन ४.६२ मीटर उंचीच्या लाटा उसळत हाेत्या. परंतु पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतली.
भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. सोनवणे यांनी यासंदर्भात शहापूर, भिवंडी, कल्याणच्या तहसीलदारांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत, असे प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी सांगितले.

जाहिरात 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









  













Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *