👁 7 Views

पिक विम्यामध्ये अंतर्भूत नसलेल्या पिकांची नुकसान भरपाई किती? सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाबाबत आमदार भालके यांचा पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 27 Julay 2017 

पिक विम्यामध्ये अंतर्भूत नसलेल्या पिकांची नुकसान भरपाई किती? 

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाबाबत आमदार भालके यांचा पावसाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्‍न!

पंढरपूर ः दि.27 –  सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशनामध्ये गुरूवार दि.27.07.2017 रोजी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी सन 2015-16 मधील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाबाबत तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. 

सन 2015-16 मधील सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाबाबत उक्त शासन निर्णयामध्ये सदर बागायती आणि ङ्गळ पिकांना अनुदान देणेबाबत स्पष्टता होत नाही, त्यामुळे सदर पिकांची अनुदान मागणीमध्ये परिगणना करणेत आली नाही असा अहवाल जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी विभागीय आयुक्त,पुणे यांचेकडे प्रस्ताव पाठविला त्यामुळे पिक विम्यामध्ये अंतर्भूत नसलेल्या पिकांसाठी प्रचलित शासन निर्णय दि.13 मे, 2015 अन्वये (एस.डी.आर.एङ्ग.) प्रमाणे खालील अनुदान वितरित करणे आवश्यक आहे. 

पिक विम्यामध्ये अंतर्भूत नसलेल्या पिकांची नुकसान भरपाई किती? असा प्रश्‍न आमदार श्री भारत भालके यांनी विचारला असता त्यावर उत्तर देतांना महसूल मंत्री मा.ना.श्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एकूण रक्कम रू.394 कोटी 56 लाख 2 हजार 869 इतकी असल्याचे सांगितले. 

एकूण बाधित खातेदार किती? असा प्रश्‍न विचारल्यानंतर महसूल मंत्री मा.ना.श्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोरडवाहू खातेदार 1,26,063 व बागायत खातेदार 2,54,567 आणि बहुवार्षिक खातेदार 88,628 असे एकूण 4,80,197 खातेदार असल्याचे सांगितले. 

डिसेंबर 2016 मध्ये शासनाने आश्‍वासन देऊनही अनुदान मिळाले नाही ते कधी मिळणार? असा प्रश्‍न विचारला असता महसूल मंत्री मा.ना.श्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, येत्या आठवड्यामध्ये विभागीय आयुक्त, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींची मुंबई येथे बैठक घेऊन पुढील कार्यवाही करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.






पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



















Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *