पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 27 Julay 2017
आंबे येथे उद्या अखंड हरिनाम सप्ताह
। पंढरपूर, प्रतिनिधी
आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग मंदिरात दि. 29 ते 2 ऑगस्ट पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहादरम्यान काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ यासह भजन किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवार दि. 29 जुलै रोजी ह.भ.प. राजाराम अंकोली (मंगळवेढा), दि. 30 जुलै रोजी ह.भ.प. छगन खडके (परळी वैजिनाथ), दि. 31 जुलै रोजी ह.भ.प. मच्छिंद्र कावडे (सुपली, पंढरपूर), दि. 1 ऑगस्ट ह.भ.प.चैतन्याजी महाराज (वासिम) व दि. 2 ऑगस्ट रोजी ह.भ.प. मधुकर गिरी महाराज यांचे किर्तन होणार असून सप्ताहाआतील ध्वजपुजन पुणे विभाग शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती व्यासपिठ चालक ह.भ.प. विष्णू बंडगर व किसन शिंदे यांनी दिली आहे.

सप्ताहदरम्यान ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111