👁 7 Views

चौरस आहारगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 31 July 2017

विधानपरिषद इतर कामकाज :

चौरस आहारगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 31 : मंत्रालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या चौरस आहारगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिकअपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लरसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंहवैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव बाजीराव जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणालेऐतिहासिक असे हे चौरस आहारगृह 1945  पासुन सुरु करण्यात आले आहे. काळानुसार ते बदलत गेले. नुतनीकरण करण्यात आलेले  आहारगृह अतिशय सुंदर व सर्व सोयीनीयुक्त आहे. याठिकाणी 1500 ते 1600 लोकांची जेवणाची सोय होते. या आहारगृहात आपण आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
हे चौरस आहारगृह 8 ऑगस्ट 1945 पासून नागरी पुरवठा विभागाच्या अधिपत्याखाली सुरु करण्यात आले होते. 1967 मध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्थायी कल्याणकारी योजना म्हणून चौरस आहारगृह ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. या आहार गृहात 20 ते 25 मिनीटात 200 व्यक्तींना जेवण पुरविण्याची व्यवस्था असल्याचे प्रास्ताविक करताना सहसचिव (उपाहारगृहे) इम्तियाज काझी यांनी सांगितले.
याप्रसंगी महाव्यवस्थापक (उपाहारगृहे) दादासाहेब खताळप्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरेवरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र जाधव तसेच मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
००००

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

इतिहासाच्या पुस्तकातील उल्लेख तपासून पाहण्याचे आदेश देणार
– विनोद तावडे
मुंबई, दि. 31 : राज्य माध्यमिक मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातील माजी प्रधानमंत्री राजीव गांधी तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रकाशित झालेला मजकूर तसेच त्यातील विशिष्ट उल्लेखांची आवश्यकता तपासून पाहावी यासाठी अभ्यास मंडळाला आदेश देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
श्री. तावडे पुढे म्हणाले, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केवळ स्वातंत्र्यपूर्व घडामोडींचाच नव्हे तर नवीन इतिहासाचाही समावेश असावा. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांची ओळख व्हावी यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. यात कोणताही राजकीय उद्देश नव्हता. हे बदल करण्यासाठी  इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सन 2000 पर्यंतच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. अनेक उल्लेखनीय व महत्त्वाच्या घटनांचा चांगला उल्लेख या पुस्तकात आला आहे. मात्र राजीव गांधी यांच्या संदर्भात आलेला बोफोर्स तोफ खरेदीचा विषय आणि इंदिरा गांधी यांचा आणीबाणीच्या काळातील संदर्भ अनावश्यक असल्याची भावना सभागृहाची झाली असल्याने तसे अभ्यास मंडळाला कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 विधानपरिषदेत सदस्य सर्वश्री संजय दत्त, सुनील तटकरे, शरद रणपिसे, भाई जगताप, कपिल पाटील यांनी 289 अंतर्गत प्रस्ताव मांडला होता.
००००

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासाठी केंद्राला विनंती करणार
– कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
मुंबई, दि. 31 : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासन काळजी घेणार असून पीक विमा योजनेची मुदत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती केली असून आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष भेटून विनंती मान्य झाल्यास याबाबत निर्णय आज जाहीर करु, अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
श्री. फुंडकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्राची योजना असून गेल्या वर्षी एक कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या वर्षीही अंतिम दिनांकापर्यंत आलेल्या सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मुदतवाढ मिळाल्यास जुन्या निकषांनुसारच लाभ मिळेल. पीक विमा अर्ज भरण्यासाठी रांगेत उभा असणारा राम पोत्रे हा 35 वर्षीय शेतकरी चक्कर येऊन खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील मंचक इंगळे हा शेतकरी दुचाकी अपघातात दगावला. या घटनेचा पीक विमा लाभ घेण्याशी संबंध आहे काय, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
विधानपरिषदेत सदस्य धनंजय मुंडे यांनी 289 अंतर्गत प्रस्ताव मांडला होता.
वृ. वि. 6262                                                                 8 श्रावण1939 (सायं. 5.35 वा.)
  दि. 31 जुलै2017
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये
शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ
मुंबई, दि. 31 राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून या संस्थेत महाराष्ट्र राज्यातील आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी या विद्यार्थ्यांना वार्षिक 20 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती त्यात आता20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून ही शिष्यवृत्तीची रक्कम आता 40 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. सदर वाढीव शिष्यवृत्तीचा लाभ जानेवारी 2017 च्या सत्रापासून प्रवेश घेतलेल्या तसेच या संस्थेत शिक्षण पुढे चालू ठेवलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201707251543593121 असा आहे.
०००
वर्षा फडके/विसंअ/ 31 जुलै 2017


वृ. वि. 6263                                                                 8 श्रावण1939 (दु. 3.55 वा.)
  दि. 31 जुलै2017
क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी
उच्चस्तरीय अंमलबजावणी समितीची स्थापना
मुंबई, दि. 31 शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 2012 मध्ये राज्याचे क्रीडा धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी  क्रीडा धोरण उच्चस्तरीय अंमलबजावणी समितीची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.  क्रीडा व युवक कल्याणमंत्री हे या समितीमध्ये सहध्यक्ष तर क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतील. याबरोबरच शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव हे या समितीमध्ये सदस्य सचिव असतील. खासदार रामदास तडसखासदार डॉ. प्रितम मुंडे- खाडे,आमदार सर्वश्री ॲड आशीष शेलारॲङ पराग अळवणीडॉ. संजय कुटेसंजय केळकर,सुनील शिंदेचंद्रदीप नरकेशशिकांत शिंदेराहुल नार्वेकरप्रवीण दरेकरॲङ यशोमती ठाकूर हे देखील या समितीत सदस्य असतील. तर वित्त आणि नियोजन विभागाचे प्रधान सचिव हे देखील या समितीमध्ये सदस्य असतील.  
याबरोबरच क्रीडा धोरण उपसमिती अध्यक्ष संभाजी पवार (कुस्ती),प्रदीप गंधे (बॅडमिंटन)आदिल सुमारीवाला (ॲथलेटिक्स)दिलीप वेंगसरकर (क्रिकेट) हे देखील या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करणार आहेत.याबरोबरच शिक्षण संचालकसहसंचालक (प्राथमिक)शिक्षण संचालक/सहसंचालक (माध्यमिक)(उच्च माध्यमिक) या समितीत असतील. अर्जुन पुरस्कारार्थी –  पुण्याचे काका पवार आणि गोपाळ देवांगशिवछत्रपती पुरस्कारार्थी – औरंगाबादचे मकरंद जोशी आणि मंगल पांडेक्रीडा संघटक – यवतमाळचे रामदास दरणेउदय देशपांडे हे सुध्दा या समितीमध्ये असणार आहेत. क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त आणि नाशिकचे विभागीय उपसंचालक यांचा सुध्दा या समितीमध्ये समावेश आहे.
या समितीची कार्यकक्षाही ठरविण्यात आली आहे. या कार्यकक्षेनुसार सदर समिती पुढीलप्रमाणे काम करेल :-
•          क्रीडा धोरणातील सर्व योजनांची व्यवस्थित कालबध्द अंमलबजावणी करणे व त्यासाठी सर्व उपाययोजना (निधी उपलब्धतताविविध विभागांना निर्देश देणेइत्यादी) करणे.
•          कालानुरुप आणि आवश्यकतेनुसार क्रीडा विकासाच्या नवीन योजना तयार करुन मान्यता देणे व सध्याच्या योजनेत सुधारणा सुचविणे.
•          याशिवाय धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल. या स्तरावरील समित्यांनी वर्षातून दोन बैठका घेऊन राज्यस्तरीय समितीला अहवाल देणे आवश्यक आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 2017072291643490621 असा आहे.
०००
वर्षा फडके/विसंअ/ 31 जुलै 2017


वृ. वि. 6264                                                                             8 श्रावण1939 (सायं. 5.00 वा.)
  दि. 31 जुलै2017
नवीन 10 परिभाषा कोश निर्मितीसाठी उपसमित्या स्थापन
मुंबई, दि. 31 : भाषा संचालनालयामार्फत नवीन 10 परिभाषा कोश निर्मिती करण्यासाठी उपसमित्या स्थापन करण्यात आली आहे.
कृषि अभियांत्रिकी परिभाषा कोश उपसमितीसूक्ष्मजीवशास्त्र परिभाषा कोश उपसमितीसंगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान परिभाषा कोश उपसमितीजल व भूमी व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमितीसागर विज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमिती,योगशास्त्र परिभाषा कोश उपसमितीआहारशास्त्र परिभाषा कोश उपसमितीजैवतंत्रज्ञानशास्त्र परिभाषा कोश उपसमितीजनसंवाद परिभाषा कोश उपसमितीआपत्ती व्यवस्थापनशास्त्र परिभाषा कोश उपसमिती अशा 10 परिभाषा 10 कोश निर्मिती करण्यात येणार आहे.
वरील विषयांकरिता नेमलेल्या उपसमित्यांवर विदयापीठांच्या / संस्थांच्या/ मंडळाच्या प्रतिनिधींच्या नेमणुकीच प्राधिकार भाषा संचालनालयाचे भाषा संचालक यांना देण्यात आले आहेत.वरील सर्व उपसमित्यांच्या मुदत एका वर्षासाठी राहील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक 201706191621201433 असा आहे.
००००
वर्षा फडके/विसंअ/ 31 जुलै 2017

वृ. वि. 6265                                                           8 श्रावण1939 (सायं. 5.00 वा.)
                                                        दि. 31 जुलै2017
दिलखुलास मध्ये सामाजिक न्याय मंत्री
        
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजना‘ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
          ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून १, २, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयीची सविस्तर माहिती सविस्तर माहिती मंत्री श्री. बडोले यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमात दिली आहे.
००००


वृ. वि. 6266                                                           8 श्रावण1939 (सायं. 5.00 वा.)
                                                        दि. 31 जुलै2017
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले जय महाराष्ट्रमध्ये
         मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची सामाजिक न्याय विभागाच्या लोक कल्याणकारी योजना‘ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.
          ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  मंगळवार दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी  ७:३० ते ८ या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयीची सविस्तर माहिती श्री. बडोले यांनी जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात दिली आहे.
००००
वृ. वि. 6267                                                           8 श्रावण1939 (सायं. 5.00 वा.)
                                                        दि. 31 जुलै2017
मौजे पिलवलीतर्फे सावर्डे गावठाणवाडी करिता
नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना
– बबनराव लोणीकर
मुंबईदि. 31 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मौजे पिलवलीतर्फे सावर्डे गावठाणवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणारी गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना पूर्णपणे नादुरुस्त झालेली आहे. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती बघून नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेअसे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज सांगितले.
 गुहागर विधानसभा  मतदार संघ जिल्हा रत्नागिरी येथील खाडी भागातील गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  आमदार भास्कर जाधवप्रकल्प संचालक हेमंत लांडगेपाणीपुरवठा विभागाचे उपसचिव महेश सावंतमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंतारत्नागिरीचे कार्यकारी अभियंता  तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
            गुरुत्व पाणी पुरवठा योजनेतून गावच्या वाडयांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे वाडयांसाठी नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदर गावासाठी नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
वृ. वि. 6260                                                                 8 श्रावण1939 (दु. 3.35 वा.)
  दि. 31 जुलै2017

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतक व जखमींना प्रधानमंत्र्यांची मदत जाहीर
नवी दिल्ली31 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना  रूपये 2 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत जाहीर  केली आहे.
             घाटकोपर येथील दामोदर पार्क जवळील सिध्दी साई ही चार मजली इमारत  २५ जुलै २०१७   रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना व जखमींना  प्रधानमंत्री कार्यालयाकडून मदत   जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर देण्यात आली आहे.
००००

वृ. वि. 6258                                                                 8 श्रावण1939 (दु. 2.25 वा.)
  दि. 31 जुलै2017
विधानसभा प्रश्नोत्तरे :
आदिवासी आश्रमशाळेत वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा
भरतीप्रक्रियेत सहानुभुतीपूर्ण विचार करण्यात येईल
 विष्णू सवरा
मुंबई, दि. 31 : आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षापासून तासिका तत्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावेशैक्षणिक पात्रतेचे निकष आणि अनुभवानुसार कर्मचारी भरतीदरम्यान तयांचा सहानुभुतीपूर्ण विचार करण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग तीन व चार या वर्गवारीतील कर्मचा-यांना सेवेत कायम करण्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उदयसिंग पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री सवरा बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री दिलीप वळसे पाटीलगणपतराव देशमुख यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
श्री. सवरा पुढे म्हणालेआश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी तासिका आणि रोजंदारीवर कार्यरत आहेत. ते तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. पूर्वीच्या कर्मचा-यांना सरसकट भरतीने नियमीत करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अनुभवाचा सहानुभुतीपूर्ण विचार शासन करेल,दरम्यान या कर्मचा-यांच्या मानधनात शासनाने वाढ केली असल्याचेही श्री. सवरा यांनी सांगितले.
००००

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

वृ. वि. 6259                                                                 8 श्रावण1939 (दु. 3.35 वा.)
  दि. 31 जुलै2017
विधानसभा लक्षवेधी :
अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत शासन सकारात्मक
– महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे
मुंबईदि. 31 : राज्यात दोन लक्ष सात हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात गठीत समितीचा अहवाल मार्च महिन्यात प्राप्त झाला. त्या अहवालानुसार वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
अंगणवाडी सेविकांमधील सेवाजेष्ठतेनुसार मानधनवाढ समितीने दिलेल्या अहवालात सुचविण्यात आली आहे. ही मानधनवाढ करताना कोणावरही अन्याय होणार नाही. अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनामार्फत मिळून एकत्रित मानधन देण्यात येते. यापूर्वी राज्याने 2014-15 मध्ये मानधनवाढ केली होती, त्यासाठी 264 कोटी रुपयांचा वित्तीय भार तिजोरीवर पडला होता.
अंगणवाडी सेविकांचामदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मे 2017 पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले असून जून 17 पासून पीएफएमएस प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मानधन विहित वेळेत सेविकांच्या बॅक खात्यावर जमा करण्याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी उत्तरात सांगितले. मुंबई शहरात अंगणवाड्यासाठी  जागा उपलब्ध होत नाही ही बाब गंभीर आहे असे सांगून लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्या देण्यात येण्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल. राज्यात 18 हजार मिनी अंगणवाड्या असून त्यांचे अंगणवाड्यात रुपांतर करण्यासाठी केंद्राची परवानगी लागते. ज्या मिनी अंगणवाड्यामध्ये मुलांची संख्या चांगली असेल त्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू, असेही त्यांनी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, भारत भालके, मनीषा चौधरी, अबू आजमी, शशिकांत शिंदे, कुणाल पाटील आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
००००
मुख्यमंत्री ने किया चौरस आहारगृह का उद्घाटन
मुंबई दि. 31  :  मंत्रालय में नवीनीकरण के बाद चौरस आहारगृह का उद्घाटन आज मुख्यमंत्री के हाथों सपन्न हुआ ।   इस अवसर पर मुख्य सचिव सुमित मल्लिकअपर मुख्य सचिव (सेवा) मुकेश खुल्लरसार्वजनिक बांधकाम विभाग के प्रधान सचिव आशीषकुमार सिंह,चिकित्सा शिक्षण विभाग के प्रधान सचिव राजगोपाल देवरासामान्य प्रशासन विभाग के सचिव बाजीराव जाधव आदि उपस्थित थे । इस अवसर पर बोलते हुए मुख्यमंत्री ने कहा कि यह ऐतिहासिक चौरस आहारगृह वर्ष 1947 में शुरू किया गया था । समयानुसार इसमें परिवर्तन होते रहे । अब नूतनीकरण के बाद यह और सुंदर तथा सबके के लिए सुविधाजनक हो गया है । यहाँ 1500 – 1600 लोगों के भोजन की व्यवस्था होती है ।   
यह चौरस आहारगृह 8 अगस्त 1945 से नागरी आपूर्ति विभाग के अंतर्गत शुरू किया गया । वर्ष 1967 में राज्य  सरकार के कर्मचारियों के लिए न हानि न लाभ के आधार पर चलाने का निर्णय लिया गया । सहसचिव (उपहारगृह) इम्तियाज काज़ी ने बताया कि इस आहारगृह में 20 से 25 मिनट के अंदर 200 व्यक्तियों के लिए भोजन की व्यवस्था करना प्रस्तावित है ।
इस अवसर पर महाप्रबंधक (उपाहारगृह) दादासासेब खतालप्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरेवरिष्ठ प्रबंधक महेंद्र जाधवतथा मंत्रालय के अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे ।
००००

Chauras Aahar Grih inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis
 Mumbai, July 31:
The newly renovated historic canteen in Mantralaya the Chauras Aahar Grih was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis. Chief Secretary Sumit Malik, Additional Chief Secretary (Services) Mukesh Khullar, Principal Secretary Public Works Department Ashish Kumar Singh, Principal Secretary Medical Education Rajgopal Deora, General Administration Department Secretary Bajirao Jadhav and other dignitaries were present on the occasion.
 On this occasion, the Chief Minister said, this historic Chauras Aahar Grih has been running since 1945. This cafeteria has been changing over time. The renovated Chauras Aahar Grih is very beautiful and well-equipped….( It has a capacity of 1500 to 1600 people who can enjoy their food….).There is a provision in the canteen that 1500 to 1600 people can have food. He also recalled that he was also coming to have dinner in this canteen.(He also shared his memories of this canteen.)
 This Chauras Aahar Grih was started from August 8, 1945, by the Civil Supplies Department. In 1967, the State Government employees decided to run Chauras Aahar Grih on non-profit basis as a permanent welfare scheme. Joint Secretary of Chauras Aahar Grih Imtiaz Kazi said that there is arrangement for providing food to 200 persons in 20 to 25 minutes in this cafeteria.
 On this occasion, General Manager (Chauras Aahar Grih) Dadasaheb Khatl, administrative officer Bhagyashree Deore, senior manager Mahendra Jadhav and ministry officials were present.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *