👁 5 Views

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या तुटपूंज्या मानधनावर व अडी-अडचणीवर सभागृहात आमदार श्री भारत भालके यांनी मंत्र्यांना धारेवर धरून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 31 July 2017


पंढरपूर ः दि.31 –  सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशनामध्ये सोमवार दि.31.07.2017 रोजी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्या संदर्भात केलेले आंदोलन, अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांचे मानधन वेळेवर न होणे, कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेणेची मागणी करण्यात येणे, सेवा निवृत्तीच्या रक्कमेत वाढ न होणे, अंगणवाडी सेविकांना राज्य कामगार विमा लागू न होणे, महागाई वाढत असतांनाच वेतन तुटपूंजे असणे याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष परिणामी राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये पसरलेला असंतोष यावर शासनाने करावयाची कार्यवाही यावर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी लक्षवेधी क्र.2 लावलेली होती.
सदर लक्षवेधीमध्ये आमदार श्री भारत भालके यांनी ग्रामविकास मंत्री ना.श्रीमती पंकजाताई मुंडे यांना 3 उप प्रश्‍न विचारले.  अंगणवाडी सेविकांना आजही रू.5 हजार प्रमाणे मानधन मिळते. मिनि अंगणवाडी मदतनीस यांना रू.3,750 इतके मानधन दिले जाते. शासनाने याबाबत किती मानधन वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे?

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

 असा प्रश्‍न विचारला.
-त्यावर मंत्री ना.श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी उत्तरात सन 2017-18 मध्ये सेविकांच्या मानधनामध्ये अर्थसंकल्पामध्ये पुरेसी तरतुद करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांच्या खात्यावर  वेळेवर मानधन जमा करण्याची दक्षता घेण्यात येत आहे असे मोघम उत्तर दिल्यामुळे, आमदार श्री भारत भालके म्हणाले की, सभागृहाला असे मोघम उत्तर देण्यापेक्षा आपण नेमकी किती वाढ दिली आहे याचा आपण नेमका खुलासा सभागृहामध्ये करावा.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पोषण आहार बनविण्यासाठी सन 2011 साली रू.4.92 पैसे मिळत होते. त्यामधून 50 पैसे इंधनाचे वजा केल्यानंतर त्या सेविकांना मुलांच्या परहेड 4.42 पैसे रहातात. त्याशिवाय गरोदर मातांना आहार देण्याचे काम सुध्दा पी.एस.आर. अंगणवाडी सेविकाच करतात. मतदान नोंदणीसाठीचा सर्व्हे सुध्दा त्याच करतात. उत्कृष्ठ पोषण आहार देतांना खिचडी, भात, लापशी व अन्न पोषण आहार देतांना शिजविण्याची प्रक्रिया करतांना इंधन म्हणून गॅस, लाकूड हे वापरल्याशिवाय अन्न पदार्थ शिजविले जावू शकत नाहीत. त्यामुळे सन 2011 पासून आत्ता पर्यंत  किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली असून महागाई वाढलेली आहे. आज खुरपणाला गेलेल्या महिलेलासुध्दा रू.250 रोजगार मिळतो मात्र अंगणवाडी सेविकांना आजही रू.150 प्रतिदिने हजेरी एवढी वरील सर्व कामे करण्यासाठी मिळते. यामध्ये आपण किती वाढ करणार आहात?  असा प्रश्‍न विचारला असता,
त्यावर मंत्री ना.श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी शासन निश्‍चितपणाने आपल्या या विचारलेल्या प्रश्‍नाचा विचार करेल व मा.मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यामध्ये आर्थिक वाढ करण्याचे धोरण ठरवून निर्णय घेण्यात येईल. तसेच त्यांचे खातेवरती मानधन लवकरात लवकर जमा होईल. अर्थ खात्याकडून आम्ही दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर त्यामधील वाढ लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे खातेवरती जमा करण्यात येईल असे सांगितले.
किमान वेतन कायद्याप्रमाणे मुळ वेतनावर या सेविका व मदतनीसांना आणणार आहात का?  असा प्रश्‍न विचारला असता,
-त्यावरती उत्तर देतांना मंत्री ना.श्रीमती पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, हा विषय केंद्र सरकारच्या अधिकारातील असल्यामुळे त्यावर आम्हाला केंद्र शासनाशी चर्चा करून त्यावर निर्णय घ्यावा लागेल. या लक्षवेधीमुळे येणार्‍या महिन्यात निश्‍चितपणाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधनामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होईल असे आश्‍वासन मंत्री ना.श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी दिले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *