पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 11 August 2017
पंढरपूर :- रेरा कायद्यांतर्गत प्रकल्पाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील प्रक्रियेसाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑगस्ट ला क्रेडाईच्या सर्व ४३ शहर संस्थांमध्ये क्रेडाईच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन केद्रांची सुरुवात करणार असल्याची माहिती क्रेडाई पंढरपूर चे अध्यक्ष आर. बी. जाधव यांनी दिली.
प्रत्येक जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांकांची नोंद करणे, प्रकल्पांविषयीची प्रगती अहवाल वेबपेज वर टाकत राहणे, कायदेशीर काळजी कशी घ्यावी,आदी गोष्टींचे मार्गदर्शन या केंद्रावर दिले जाणार आहे.
“कायदा चांगला असून त्याचे स्वागतही आम्ही केले आहे.पण प्रत्येक विकासकाला रेराच्या लहानात लहान पैलूची माहिती असणे आवश्यक आहे यामुळेच भविष्यात होणाऱ्या चुका कमी होण्यासाठीच क्रेडाई महाराष्ट्र रेरा अभ्यास समिती मार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा फायदा जास्तीत जास्त विकासकांना घेता यावा हाच या मागचा उद्देश आहे.
यामुळे निश्चितच क्रेडाईच्या सर्व सदस्यांना या कायद्यांशी अधिक सुसंगतपणा साधता येईल आणि त्यांचे व्यवसाय सहजतेने चालवण्यासाठी मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त प्रकल्प रेरा अंतर्गत येऊ शकणार असल्याने याचा फायदा पर्यायाने ग्राहकांनाच होईल.”
क्रेडाई संस्थे बद्दल:- क्रेडाई महाराष्ट्रही संघटना ही राज्यातील ७५टक्क्यांपेक्षा जास्त महत्वाच्या विकासकांच्या संघटीत बांधकाम क्षेत्रासाठी (मुंबई वगळता) ओळखली जाते. यात 43 शहर संघटनांमधील २६०० विकासकांचा समावेश आहे. धन्यावाद विवेक अमरनाथ परदेशी ( P R O क्रेडाई पंढरपूर )
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे कत्पनेतुन डिजीटल विडीयो वॅन चे उदघाटन रोटरी क्लब चे साह सचीव नगरसेवक विवेक परदेशी यांच्या शुभ हस्ते झाले. वारी मध्ये स्वच्छता खुप महत्वाची असते , विडीयोच्या माध्यमातुन “मिसींग डॉटर ऑफ ईडीया ” ( स्त्री भुण हत्या ) व स्वच्छतेचे महत्व सांगणारे स्वच्छ भारत अभीयान चे लघु चित्रपट दाखवण्यात येणार आहे . याचा वारी कालावधी मध्ये खुप उपयोग होणार आहे . या प्रसंगी अध्यक्ष डॉ सचीन दोशी , अकुंश कोलवार, जयंत हरीदास, संजय बेगलोरकर, मिलींद वंजारी, आराध्ये, महेश निर्मळे, प्रशांत कुलकर्णी , नगरसेवक विवेक परदेशी आदी उपस्थीत होते .
१ ) प्रजीत परदेशी २ ) जमप्रकाश गुप्ता ३ ) धनाजी पनाळे ४ ) पारस पांचाळ या चार सहकारी व लिम्का रेकॉड चे परिक्षक जयंत डोफे सर यांनी आज पांडूरंगाची भूमी पंढरपूरात प्रवेश केला . पंढरपूरात त्याचे परदेशी मित्र परिवाराच्या वतीने , पंढरपूर अर्बन बँक व पंढरपूर नगरपरीषदेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आहे. प्रवासात खुप त्रास झाला पण केवळ पांडूरंगाच्या नामस्मरणाने आम्ही हा प्रवास पार पाडू शकतो असे प्राजीत परदेशी यांनी सांगीतले. या प्रसंगी अर्बन बँकेचे व्हा चेअरमन दिपक शेटे , गटनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक संजय निंबाळकर, परदेशी, नारायन सिंगन, माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी, नगरपरिषदेचे क.अभियंता मुकुंद जोशी व परदेशी मित्र पारिवार आदि उपस्थीत होते .
कु.शर्मदा रघुनाथ कुलकर्णी एस.एस.सी. परिक्षेत १००% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम आली त्या बद्धत तीचा सत्कार करताना नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी व आर देशमुख क्लासेस चे संचालक रामचंद्र देशमुख सर , कुबेर डोपे सर,वडील आर् एस कुलकर्णी सर व आई उपस्थीत होते. यशाचे रहत्स सांगताना तिने आई वडीलांचा सपोर्ट होता वडील स्वतः संस्कृत विषयाये शिक्षक आहेत व शर्मदा ला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण आहेत . गणीत व विज्ञान विषयाचे शिक्षक आर देशमुख सर यांचे ई. ५ वी पासून गणीत व विज्ञान विषयाचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांनी यशाचा पाया रचला. आभ्यासा बरोबर शर्मदा ला संगीत व चित्रकला विषयाची ची आवड होती त्यामुळे तिचे आभ्यासातील कॉसनट्रेशन वाढुन वर्षभर चांगला आभ्यास झाल्लाचे शर्मदाने सांगीतले. नगरसेवक विवेक अमरनाथ परदेशी व परदेशी मित्र परिवार यांच्या वतीने शर्मदा कुलकर्णी यांस तीच्या भावी करीयर साठी शुभेच्छा.
बाथ्री तेली समाज पंढरपूर यांचा चांगला ऊपक्रम *दुष्काळी परिस्थिती ची जाणीव ठेवून , सामाजिक बांधिलकी राखून , आणावश्यक खर्चाला फाटा देऊन, साखरपुड्यात लग्न समारंभ पार पाडला* पंढरपूर,.दि.२१मे, जालण्याचे रहिवासी ईश्वरलाल परदेशी यांचा मुलगा चि.नितीन साठी मुलगी पाहण्यास पंढरपूर येते आले चि. नितीन यांनी मांजरी, पंढरपूर येथील किशोर परदेशी यांची मुलगी शितल ला पसंत केले व शितल नेही होकार दिला व त्वरित साखरपुडा करण्यास सहमती दिली. बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अमरनाथ परदेशी यांनी दुष्काळी परिस्थिती ची जाणीव ठेवून, सामाजिक बांधिलकी राखून , आणावश्यक खर्चाला फाटा देऊन, साखरपुड्यात लग्न समारंभ पार पाडवे अशी सुचना मांडली, अपाध्यक्ष विजय परदेशी , बाळासाहेब परदेशी, हरीलाल परदेशी, सुकलाल परदेशी,संजय परदेशी,माजी नगरसेवक प्रकाश परदेशी यांनी सुचना बरोबर असल्याचे सांगुन ईश्वरलाल परदेशी यांना विनंती केली व थी परदेशी यांनी साखरपुड्यात लग्न पार पाडण्यास माण्य केले. बाथ्री तेली समाज भवन, जुनी पेठ, पंढरपूर येथे सायंकाळी विवाह सोहळा आनंदात पार पडला. या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कोतुक होत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


