सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर ः दि.10- सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशनामध्ये गुरुवार दि.10.08.2017 रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सुचना मांडून श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वारीच्या कामातील निकृष्ठ कामांना वाचा ङ्गोडली. यामध्ये प्रामुख्याने 1) चंद्रभागा नदीतील वाळू उपशामुळे गवळी समाजातील चार चिमुकल्यांचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून झालेला मृत्यु 2) उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर (सरकारी दवाखाना) यातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा तसेच दवाखान्यातील गैरप्रकार 3) चंद्रभागा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा चोरी प्रकरण 4) चंद्रभागा वाळवंट परिसरात नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेले सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बंद असणे 5) पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने वारी काळात शहरात बसविण्यात आलेले मोबाईल टॉयलेट,यामध्ये करोडो रुपयांचा होत असलेला गैरव्यवहार 6) राज्य शासनाने नव्याने स्थापित केलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये स्थानिक वारकर्यांना स्थान न देणे 7) तिर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच नगरोत्थान या योजने अंतर्गत होत असलेली रस्त्यांची बोगस कामे इत्यादी प्रमुख विषयासह अनेक विषयाला आमदार भालके यांनी वाचा ङ्गोडली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात मात्र राज्य सरकार,स्थानिक प्रशासन आणि मंदिरे समिती या वारकर्याच्या सोई-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचा मुद्दा आमदार भालके यांनी लक्षवेदीव्दारे आपल्या परखड व मुद्देसुद भाषणाने राज्य शासनाला धारेवर धरल्यामुळे तातडीने वरील सर्व मुद्दयावर निर्णय घेवून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे नगर विकास राज्यमंत्री श्री रणजित पाटील यांनी विधानसभेत सांगीतले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


