पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 12 August 2017
अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग पसरले असून ३८० तालुक्यांपैकी तब्बल २५४ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पंढरपूर तालुक्यात तर अद्याप पेरण्या करता येतील इतपही पाऊस पडलेला नाही..! पंढरपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्याच्या कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार ८ ऑगस्टपर्यंत फक्त ६१ तालुक्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला तर ५१ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. जर पुढील आठवडय़ापर्यंत या भागात पाऊस झाला नाही तर पीक सर्वेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत असे फुंडकर म्हणाले.
जुलैअखेरीस पाऊस आठवडाभर विश्रांती घेईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही आठवडय़ांपासून पावसाने पाठ फिरवली आहे.
पावसाने अशीच ओढ दिली तर शेतकऱ्यांना आणखी सरकारी मदत देण्यात येईल, असे कृषी खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


