👁 10 Views

गोरक्षेसाठी वृंदावन ते दिल्ली विशाल पदयात्रेचे आयोजन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 13  August 2017

  पंढरीत पुर्वतयारीसाठी राजव्यापी बैठक संपन्न
 * अनेक संत महंतांची बैठकीस उपस्थिती *
देशाच्या संस्कृतीचे आणि समृध्दीचे प्रतिक असलेल्या गोमातेच्या रक्षणासाठी दिल्लीस्थीत सुरभी ग्लोबल नैतिक शिक्षा केंद्रासह महाराष्ट्रातील अनेक गोरक्षक संस्थांची बैठक पंढरीत शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी पार पडली असून या बैठकीत वृंदावन ते दिल्ली अशी विशाल गोरक्षा अभियान यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून 3 मार्च ते 13 मार्च 2018 या कालावधीत या गोरक्षा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती या बैठकीचे संयोजक नारायणदास महाराज यांनी दिली आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


      येथील शनेश्‍वर मठ येथे आयोजीत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी राजेंद्रदास महाराज हे होते.तर या बैठकीसाठी दिनबंधू दास महाराज,स्वामी जय महाराज,बि.व्ही.षिष्णूदास महाराज,महामंडलेश्‍वर शिवरामदास महाराज,महामंडलेश्‍वर गंगादास महाराज,महामंडलेश्‍वर जमुनादास महाराज हे उपस्थित होते.वृंदावन ते दिल्ली या गोरक्षा यात्रेसाठी जनजागृती करण्याच्या हेतून देशातील 200 जिल्ह्यात मोहीम हाती घेण्यात येणार असून यात विविध संघटना,संतमंडळी,सहभागी होणार असल्याची माहीती यावेळी अध्यक्ष दिनबंधूदास महाराज यांनी दिली.यासाठी गोरक्षा अभियान यात्रा सहभाग पत्र भरुन घेण्यात येणार आहेत.गोवंश व कृषी आधारीत जिवन प्रणालीचे पुनर्रजिवन करणे,जैविक कृषी विकासावर भर,गोमाता आणि गोवंश यांच्यापासून प्राप्त होणार्‍या उत्पादनांचा प्रसार,भारतात गोहत्याबंदी पुर्णपणे रोखणे,गोमांस निर्यात पुर्णपणे थांबवीणे,विश्‍वभरात शाकाहार व अहिंसा या तत्वांना प्रोत्साहन देणे,युवापिेढीमध्ये नैतिक जिवनमुल्यांना जास्तीत जास्त महत्वदेण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी हेतूने या विशाल पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती त्यांनी दिली.
          दिल्लीस्थीत सुरभी ग्लोबल नैतिक शिक्षा केंद्र व देशभरातील विविध गोरक्षक संघटना या विशाल पदयात्रेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत असून त्यास देशभरातील सर्व राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.सोलापूर जिल्यातील गोरक्षकही या पदयात्रेत मोठया प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहीती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *