👁 11 Views

भाविकांच्या गाड्यांमधील चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांना निवेदन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 13  August 2017

भारताची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या पंढरी नगरीत दररोज हजारो यात्रेकरू व भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. जे भाविकभक्त आपल्या वाहनांद्वारे पंढरपूरला येतात, ते लोक आपली वाहने चंद्रभागा नदी लगत असणार्‍या अंबाबाई पटांगण येथील पार्किंगमध्ये पार्क करून आंघोळीसाठी व दर्शनासाठी जातात. तेंव्हा त्यांना परतण्यासाठी किमान 4 तासांचा कालावधी लागतो. या मधील काळामध्ये सदर भाविकांच्या वाहनांमधील पैसे, मोबाईल, कपडे, दागदागिने, गाडीचे टायर किंवा पार्ट व मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे अनेक प्रकार येथे घडलेले आहेत. तेंव्हा अशा वारंवार होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी विक्रम शिरसट मित्र मंडळाने पोलीसांना निवेदन या चोर्‍यांवर आळा घालण्याची मागणी केली आहे.
यावेळी मुकुंद नेहतराव, सोमनाथ कोळी, अनिल तारापूरकर, आकाश पांढरे, पांडुरंग सावंतराव, विजु कोळी, भृगेश ननवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *