👁 4 Views

मराठवाड्यात फक्त रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस …. अतिवृष्टी नाही!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399


mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 20 August 2017 

    औरंगाबाद – मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये शनिवारी अतिवृष्टी होण्याचा वेधशाळेने दिलेला इशारा रिमझिम बरसत पावसाने पुन्हा एकदा फोल ठरवला. ८ जिल्ह्यातील ७६ पैकी एकाही तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही. बीड जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात ३ मी मी पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, हिंगोली, जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला खरा, परंतु रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा.

    नांदेड, परभणी येथे सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. लातूर येथे दुपारनंतर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सायंकाळपर्यंत रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातही असाच पाऊस झाला. डोंगरकडा, कनेरगाव नाका, खिल्लार-अडोळ, आखाडा बाळापूर या भागात मात्र चांगला पाऊस झाला.


    लातूरकरांना हवा पाऊस
    लातूरला शनिवारी दुपारनंतर काही काळ फक्त रस्ता ओला होईल इतकाच रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन, मूग, उडीद अशी पिके पाण्याअभावी माना टाकीत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्याच्या काही भागात तुरळक सरी कोसळल्या. शेतकरीही मुसळधार पावसाकडे डोळे लावून बसले होते.
    उस्मानाबादसह येडशीत बरसला
    शनिवारी(दि.१९) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरासह येडशी भागात मध्यम तर अन्य भागात रिमझिम पाऊस झाला. तुळजापूर, येडशी, परंडा, भूम, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, येरमाळा भागातही रिमझिम पाऊस झाला. ज अधूनमधून रस्ते ओले होत होते. सायंकाळी पाचनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
    हदगाव वगळता इतर तालुक्यात रिमझिम
    वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी नांदेड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना उभारी मिळाली आहे. पावसाअभावी पिकेही सुकू लागली होती. आकाशात ढग जमा होत होते. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सकाळी १० पासून पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू झाला. नंतर थोडा जोर वाढला आणि ओसरला. दुपारी चार वाजेपर्यंत रिमझिम मात्र सुरू होती.
    औरंगाबाद: सकाळपासून हलक्या सरी
    जिल्ह्यात तब्बल ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले. मात्र दमदार सरींऐवजी हलक्या सरी कोसळल्यामुळे आभाळाकडे नजरा खिळून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. शनिवारी सकाळपासून वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री परिसरात ढगाळ वातावरण होते. या तालुक्यांत हलका पाऊस झाला.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *