👁 5 Views

आ.भालके यांचा विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

 व Android Application पंढरपूर Live 

येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..

परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

आ.भारत भालके यांना सन्मापत्र देऊन गौरव करताना केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, नगराध्यक्षा साधना भोसले, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड, नगरसेवक महादेव भालेराव, अनिल ननवरे.

पंढरपूर Live 20 August 2017 

मागील अनेक वर्षांपासून आंबेडकर चळवळीत दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचा केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने गौरव करण्यात आला.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील योगदान तसेच आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये असलेला मोलाचा सहभाग याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आ. भारत भालके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनमोहक पुर्णाकृती पुतळा स्मारक समितीस भेट दिला. याचबरोबर पंढरीत विश्‍वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी आ. भारत भालके यांनी पंढरपूर नगरपालिकेतील सत्ताकाळात अतिशय आग्रही भूमीका घेत मोठी अर्थिक तरतुद करुन स्मारकाच्या उभारणीचा शुभारंभ केला होता.
या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या सुवर्णक्षणी समस्त भीम सैनिकांच्या वतीने उत्तरदायित्व म्हणून आ.भालके यांच्या अलौकिक कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी कर्तव्याच्या भावनेतून सन्मानपत्र देऊन आ.भारत भालके यांचा गौरव केल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डि.राज सर्वगोड यांनी केले. 
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, विधानपरिषद सदस्य दत्तात्रय सावंत, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, रिपाईचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, नगरसेवक महादेव भालेराव, प्रतिष्ठानचे पदाधिकारी अनिल ननवरे, आदम बागवान, सुरेश नवले, विशाल आर्वे, किरण डावरे, अजिंक्य देवमारे, दिपक नाईकनवरे, प्रा. सुदर्शन मसुरे आदी उपस्थित होते. 

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *