👁 9 Views

सोलापूर विद्यापीठ नामांतर मुद्यावर भाजपला ‘घरचा आहेर’

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 26 August 2017 


    सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या धनगर समाजाने भाजपला लक्ष्य बनविण्याचे ठरविले आहे. यात भाजपचेच पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पक्षावर धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचा आरोप केल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
    अहिल्यादेवी होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यासाठी यापूर्वी धनगर समाजाने आंदोलन छेडले होते. त्याचा राजकीय लाभ घेत भाजपने सत्तेवर आल्यास धनगर समाजाला पूरक आश्वासनही दिले होते.  धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने जसे बासनात बांधून ठेवले आहे, तसे सोलापूर विद्यापीठ नामांतराचा मुद्दाही अडगळीत टाकला आहे. अलीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनंतर सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावर धनगर समाजाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी धनगर समाजाने या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शक्तिप्रदर्शन करीत मोर्चा काढण्याचे ठरविले आहे.
    या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी आयोजिलेल्या एका बैठकीत अर्थात कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात व्यक्त केलेला संताप विचारात घेऊन याच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पक्षापेक्षा समाज मोठा या न्यायाने भूमिका स्पष्ट केली. एवढेच नव्हे, तर भाजप सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत असल्याचा थेट आरोपही केला. भाजपने राज्यात सत्तेवर आल्यानंतर  मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी भाजप सरकार धनगरांना आरक्षण देण्याचे नाव घेत नाही. दुसरीकडे सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावरही दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करीत पाटील यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *