👁 8 Views

कर्जमाफी अंमलबजावणीवर किसान क्रांती समन्वय समितीचे बारीक लक्ष

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 29 August 2017 


    किसान क्रांती समन्वय समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून अद्याप शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी चा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांनी खालील माहिती सविस्तर वाचून संपर्क साधावा असे आवाहन किसान क्रांती समन्वय समितीचे वतीने करण्यात आले आहे.


    *किसान क्रांती वृत्त*
    *कर्जमाफी अंमलबजावणीवर किसान क्रांती समन्वय समितीचे बारीक लक्ष*
    *_सविस्तर वृत्त_*
    🚩 राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव मिळावा यासाठी किसान क्रांती जन आंदोलनच्या वतीने दि. २५ मे पासून पुणतांबा येथे धरणे आंदोलन व दि. १ व २ जून रोजी राज्यभर ऐतिहासिक शेतकरी संप घडवून आणला.
    ➖➖➖➖➖
    🚩 दि. ३ जून रोजी पहाटे सरकारसोबत झालेल्या चर्चेत अल्पभूधारक (५ एकराच्या आतील) शेतकऱ्यांना विनानिकष व विनालिमीट, २०१७ च्या थकीत शेतकरी खाते धरून कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. सदर कर्जमाफीची रक्कम अंदाजे ३५ हजार कोटींपर्यंत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
    ➖➖➖➖➖
    🚩 त्यानंतर सुकाणू समितीच्या माध्यमातून दि.११ जून रोजी सरकारसोबत चर्चा करून अल्पभूधारक ऐवजी निकषानुसार सरसकट कर्जमाफी मान्य केली. 
    ➖➖➖➖➖
    🚩 मात्र त्यानंतर सरकारने जमीनीच्या क्षेत्राऐवजी कर्जमाफीच्या रकमेवर मर्यादा घातली व ३० जून २०१६ पर्यंतचेच  खाते व धरून प्रक्रिया सुरू केली. तसेच पुन्हा ही देखील कर्जमाफी ३५ हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगितले.
    ➖➖➖➖➖
    🚩 प्रत्यक्षात सध्या राज्यभरात विविध केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, सरकारच्या वतीने प्रशासनाला कर्जमाफीचे अर्ज मिशन लेवलवर भरून घेण्यास आदेश दिले आहेत.
    ➖➖➖➖➖
    🚩 सदरच्या संपूर्ण कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर किसान क्रांती जन आंदोलनाची समन्वय समिती बारीक लक्ष ठेवून आहे, सध्या समन्वय समिती सदस्य विविध केंद्रांवर जाऊन प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होतो आहे याची पडताळणी करीत आहेत.
    ➖➖➖➖➖
    🚩 शासनाने घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफीची एकूण रक्कम ३५ हजार कोटी किंवा आसपास असावी अशी समितीची अपेक्षा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्यास शासनाला जाब विचारला जाणार आहे.
    ➖➖➖➖➖
    🚩 *दरम्यान काही शेतकऱ्यांना अद्याप शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्याकरीता अडचणी येत असतील तर*
    *१८००१०२५३११*
    *या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन किसान क्रांती जन आंदोलन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.*
    〰〰〰〰〰〰〰



    *अधिकृत प्रसिध्दीसाठी -*
    *द्वारा संदीप गिड्डे (SS ABA)*
    *राज्य समन्वयक, किसान क्रांती जन आंदोलन*
    किसान क्रांती जन आंदोलनच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील अधिकृत फेसबुक पेज लाईक करा.
    https://m.facebook.com/kisankrantimorcha/

    _ई वृत्तांत बळीराजा माहिती सेवा_

    *कृषी प्रदर्शन वृत्त*

    👳👳👳👳👳👳

    🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

    ✔ *माळशिरस, जि.सोलापूर*

    दि.१४ ते १८ सप्टेंबर,

    स्थळ – पुणे-पंढरपूर रोड, माळशिरस

    आयोजक – पंचायत समिती, माळशिरस

    संपर्क – 9766382285

    🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

    ✔ *अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर*

    दि.२१ ते २४ सप्टेंबर,

    स्थळ – साखर कारखाना मैदान

    आयोजक – अशोक सहकारी साखर कारखाना लि., अशोकनगर

    संपर्क – 9049318198

    🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

    ✔ *पलूस, जि.सांगली*

    दि.२६ ते २९ आक्टोबर,

    स्थळ – लकि महाविद्यालय मैदान

    आयोजक – क्रांती सहकारी साखर कारखाना लि., कुंडल

    संपर्क – 9096160462

    🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

    *Event By – SURESHOT*

    _ई वृत्तांत बळीराजा माहिती सेवा मार्फत वेळोवेळी शेतीविषयक पोस्ट प्राप्त करण्यासाठी 7020890046 हा नंबर तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा._

    *ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा.*



    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *