👁 12 Views

के. बी. पी. च्या कु. मोनिका सावंत यांना वाणिज्य विभागातील दोन सुवर्णपदके

Pandharpur Live :

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मोनिका अण्णा सावंत हिस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत बी. कॉम. परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल ‘श्रीमती चंद्रभागा पांडुरंग बंडगर सुवर्णपदक व अकाउंट विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल ‘The Institute of Chartered Accountants of India Gold Medal’ या दोन्ही सुवर्णपदकाने विद्यापीठाच्या १५ व्या पदवीदान समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे. हा पदवीदान समारंभ २७ डिसेंबर रोजी विद्यापीठात संपन्न होणार आहे. 


अनुक्रमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. बी. पी. बंडगर यांनी मातेच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सुवर्णपदक ठेवले आहे. तर इन्स्टिट्युट ऑफ चार्टेड अकांऊट ऑफ इंडियाचे संचालक विजय कुपर यांनी दुसरे सुवर्णपदक ठेवले आहे.
वाणिज्य शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागीय चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यिनीचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनीस वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, डॉ. मधूकर पांचाळ, डॉ. बजरंग शितोळे, प्रा. तुकाराम अनंतकवळस, प्रा. सागर शिवशरण व प्रा. कु. आएशा नदाफ यांनी मार्गदर्शन केले. कु. मोनिका सावंत हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन स्तरातून कौतुक होत आहे.  
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *