👁 10 Views

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात-शरद पोंक्षे

Pandharpur Live : 
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात, म्हणून आपल्याला ते पटत नाही. त्यामुळे मी संघ सोडला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक झालो, “असं मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं.  कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. शरद पोंक्षे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राम्हण होते म्हणून त्यांना विरोध होत आहे. सावरकर आणि त्यांच्या पत्नी यांनी कधीही जातीभेद मानला नाही. ते अन्य जातीचे असते तर त्यांना विरोध झाला नसता. यामागे जातीयवादाचं राजकारण आहे,” असं त्यांनी सांगितलं.

हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असं म्हटल्यानं दुसऱ्या भाषांचा अपमान होत नाही. त्यामुळे ‘गर्व से कहो हम हिंदू है’, म्हटल्यानं दुसऱ्या धर्माचा अपमान होत नाही. हिंदू धर्मासारखा दुसरा सेक्युलर धर्म नाही. हिंदू असणं म्हणजेचं सेक्युलर असणं आहे. हिंदू असणं हेच माणूस असणं आहे,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

“शिवरायांच्या हातात शस्त्र होतं म्हणूनच ते अफजलखानाचा वध करू शकले, त्यामुळे गांधीजींच्या अहिंसा तत्वापेक्षा सावरकरांची तत्व अधिक श्रेष्ठ होती. सावरकर यांना वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ज्या माणसाने जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिजवलं, त्याच माणसाला ब्राम्हण या तीन अक्षरामध्ये बंदिस्त करुन टाकलं आहे. आंबेडकर, फुले यांच्यापेक्षा सावरकर मला काकणभर श्रेष्ठ वाटतात. जे मला वाटतं ते वाटतं. कुणाला माझा पुतळा जाळायचा तर जाळा, असं ते म्हणाले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *