👁 6 Views

पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अविष्कार मध्ये पारितोषिक

Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या ओंकार माने व प्रतिक कुलकर्णी या विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अविष्कार 2020 मध्ये पारितोषिक प्राप्त झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

5 जानेवारी 2020 रोजी विद्यापीठ स्तरीय झालेल्या आविष्कार ह्या प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील ओंकार माने व प्रतिक कुलकर्णी या दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले असुन महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील चतुर्थ वर्षातील ओंकार माने ह्या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक तर एम. टेक. डिझाईन   चे शिक्षण घेत असलेले प्रतीक कुलकर्णी यांनी व्दितीय क्रमांक मिळवला आहे.

  अविष्कार या प्रकल्प स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. प्रसाद कुलकर्णी ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
   पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. श्रीनिवास गंजेवार आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *