👁 6 Views

स्वेरीमध्ये एमएचटी-सीईटी २०२० करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

Pandharpur Live : 

पंढरपूर – येत्या  एप्रिल २०२० मध्ये  होणार्‍या ‘एमएचटी-सीईटी २०२०’ परिक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया दि. ७ जानेवारी २०२० पासून सुरु झाली असून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२० साठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
         पदवी इंजिनिअरींग व पदवी फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या  ‘एमएचटी-सीईटी २०२०’ या परीक्षा १३ एप्रिल ते १७ एप्रिल व २० एप्रिल ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षांसाठी फॉर्म भरण्याची मुदत दि.०७ जानेवारी २०२०  पासून ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत असून यासाठी पीसीएम व पीसीबी विषयांकरीता प्रत्त्येकी रु.८०० (जनरल) व रु. ६०० (अनुसूचित जाती-जमाती) शुल्क आकारण्यात येत असून हे शुल्क ऑनलाईन भरायचे आहे. त्यानंतर दि. १ मार्च ते ७ मार्च पर्यंत विलंब शुल्क म्हणून अतिरिक्त रु. ५०० असणार आहेत. दि. ०७ जानेवारी पासून ते ७ मार्च पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वेरीतील कॉम्प्युटर सायन्स अँण्ड  इंजिनिअरींग विभागात हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून विद्यार्थ्याना सीईटी फॉर्म भरण्यासाठी आयडेंटी कार्डच्या आकाराचा रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड या बाबी आवश्यक असणार आहेत. या ‘एमएचटी-सीईटी २०२० परीक्षा संदर्भात अधिक माहीतीसाठी मोबा. नंबर– ९१६८६५५३६५ व ७७५५९९०२०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *