Pandharpur Live :
मुजोर झालेल्या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी आता तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दमदारपणे पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. कारण आंबे येथे अवैध वाळू उपशावर कारवाई केल्यानंतर होडीतून पैलतिरावर जात खरसोळी येथील वाळू साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी चळे व पुळूज मंडलमधील मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे संयुक्त पथक तयार करून गुरूवारी सकाळी आंबे व खरसोळी परिसरात धाड टाकली. तेंव्हा भीमा नदीपात्रा लगत असलेल्या शेतकर्यांच्या अनेक शेतांमध्ये अवैध वाळूचे मोठमोठे ढिगारे असल्याचे दिसून आले.
वाळुमाफिया हे साधी चौकशी करायला जरी कोणी आले तर धाकदडपशाही करत असतात… प्रसंगी प्रशासकीय अधिका-यांवर हल्ले सुध्दा करतात… तरीही तहसिलदार वाघमारे कोणतेही पोलीस प्रोटेक्शन न घेता या ठिकाणी धाडसाने गेल्या आणि कारवाई केली.
यानंतर पैलतिरावरील खरसोळी भागातही अवैध वाळू साठे असल्याचे लक्षात येताच तात्काळ तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी होडीतून प्रवास करित पैलतिरावर जाऊन वाळू साठ्यावर कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान या पथकासोबत कोणतेही पोलीस संरक्षण नव्हते. त्यामुळे तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या सर्व पथकाचे आंबे, खरसोळी परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे. कारण येथे एखादे शासकीय वाहन अथवा कर्मचारी नजरेस पडला तर लगेच वाळू माफिया त्यांना गराडा घालून अरेरावी करून हुसकावून लावत असल्याचे प्रकार या अगोदर अनेकदा याभागात घडले आहेत. जप्त केलेला वाळू साठा शासकीय धान्य गोदामामध्ये आणण्यात आला. सुमारे चार तास चाललेल्या या कारवाईमध्ये चळे मंडल अधिकारी संतोष सुरवसे, पुळूज मंडल अधिकारी गणेश टिके, तलाठी बी.ए.गोरे, सखाराम डोरले, ए.बी.काळेल, पी.टी.गुजले, कोतवाल महादेव बंडगर, गणेश कांबळे, महादेव खिलारे, माणिक खंदारे यांचा समावेश होता. तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी धाडसी कारवाई करत पहिल्याच दणक्यात जवळपास 70 ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला असल्यामुळे वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून ग्रामस्थांमधून मात्र तहसिल प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999