👁 7 Views

‘शिक्षकाचे मोठेपण हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या यशात असते.’ – प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम

Pandharpur Live : 
रविवार दिनांक : 4-1-2020 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर व पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. अर्चना व्हरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. नवनाथ गोडसे यांचे “तुम्हाला बोलता येते ना ? मग भाषण काय अवघड ? ” हे ब्रीद घेऊन पंढरपूर मध्ये वक्तृत्व, सूत्रसंचालन व व्यक्तिमत्त्व विकासाचे दर्जेदार व तंत्रशुद्धपणे प्रशिक्षण देणा-या अभिनव अकॅडमी मध्ये ‘माझी वक्तृत्वाची तयारी’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. प्रिया नलबिलवार यांच्या ईशस्तवनाने झाली. अभिनव अकॅडमीचे अभ्यागत व्याख्याते सोमनाथ गायकवाड यांनी अकॅडमीची संकल्पना व तिला मिळालेले यश व पुढील काळात अभिनव अकॅडमीच्या नव-नवीन संकल्पना व सर्व क्षेत्रात असणारी वक्तृत्वाची गरज आपल्या प्रभावी मनोगतात मांडली.

‘माझी वक्तृत्वाची तयारी’ हा विषय मांडताना नवनाथ गोडसे यांनी उत्स्फूर्त वक्तृत्वाबद्दल मार्गदर्शन करताना आपल्या विनोदी व खुमासदार शैलीतून स्वत:च्या जीवनातील उदाहरणावरून हे स्पष्ट करून आपले ओघवते विचार ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यापीठाचे नूतन प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम सरांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यांनी अभिनवच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वक्तृत्वाच्या प्रसार, प्रचाराचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले व शिक्षकाचे मोठेपण हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या यशात असते व प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही मुलभुत कला कौशल्ये असतात त्या कौशल्यांना विकसीत करण्यासाठी योग्यवेळीच संधी दिली पाहिजे आणि हीच संधी अभिनव अकॅडमी आपल्याला देत आहे हे उद्गार काढून अभ्यागत व्याख्यात्यांचे व प्रशिक्षणार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील संकल्पनांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मान्यवरांचा सत्कार अकॅडमीचे संचालक श्री. मंदार केसकर, श्री. सोमनाथ गायकवाड, सौ. मैत्रेयी केसकर, डॉ. सचिन लादे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत अभिनव अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी डॉ.  औदुंबर तळेकर, प्रास्ताविक श्री. राजेंद्र गिड्डे सर यांनी, अध्यक्षीय सूचना श्री. अशोक महामुरे, अनुमोदन अधिवक्ता विजय जाधव , पाहुण्यांचा परिचय सौ. वीणा व्होरा व श्री. दत्तात्रय रेगुडे तर आभार श्री. नवनाथ शिंदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. श्रिया भोसले, सौ. सरस्वती मोहिते, सौ. मनीषा गायकवाड,  ओम महामुनी, अभिजित सरवदे, धैर्यशील भोसले, शेखर कोरके सर, संतोष पाटील सर, शांताराम गाजरे सर, अविनाश माने, श्री. कवडे सर आदींनी  परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास अभिनव अकॅडमी चे माजी प्रशिक्षणार्थी इंजिनिअर श्री. आशिष शहा, सचिन पंढरपुरकर, श्री. चैतन्य कुलकर्णी, एलआयसी चे विकास अधिकारी श्री. रणजित जगताप, सौ. दमयंती पाटील, सौ. भाग्यश्री लिहणे, सौ. माया कुलकर्णी, कु. सुरूची कुलकर्णी, श्री. अनुप देवधर, पैलवान विजय भुसनर आदींजण उपस्थित होते.
त्याच बरोबर अन्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आकर्षक, सूत्रसंचलन कु. ज्ञानदा रत्नपारखी व महेश ब्रेदर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री. संतोष महामुनी व अभिजित गायकवाड यांनी पसायदानाने झाली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *